पाकड्यांनी गाठला निर्लज्जपणाचा कळस; दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना करणार कोट्यावधींची मदत

India Pakistan Tension | भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला मोठा धडा शिकवला. या मोहिमेद्वारे भारतीय लष्कराने ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केले. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या हल्ल्यात ठार झालेल्या प्रमुख दहशतवाद्यांमध्ये अबू जुंदाल, यूसुफ अझहर यांची नावे समाविष्ट आहेत.
यात दहशतवादी मसूद अजहर याच्या कुटुंबातील १४ सदस्य मारले गेले. त्यानंतर दहशतवाद्यांच्या जनाजाला पाक लष्कराचे अधिकारी उपस्थित राहिले होते. ज्याचे व्हिडिओ देखील समोर आले होते. आता मात्र पाकने निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. पाकिस्तान सरकारकडून हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना कोट्यवधी रुपये दिले जाणार आहेत.
यासाठी पंतप्रधान शरीफ यांनी ‘शुहादा पॅकेज’ची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या म्हणण्यानुसार, ऑपरेशन सिंदूरच्या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 20 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. India Pakistan Tension |
पाकिस्तानच्या शुहादा पॅकेजमध्ये काय आहे?
पाकिस्तान सरकारच्या म्हणण्यानुसार, या पॅकेज अंतर्गत हल्ल्यात ठार झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांना 2 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर दहशतवाद्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. जखमी दहशतवाद्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 20 लाख रुपये दिले जाणार आहेत. दहशतवादी मसूद अजहरला देणार 14 कोटी रुपये दिले जाणार आहेत. तसेच हल्ल्यात नुकसान झालेल्या मदरशांच्या पुनर्बांधणीसाठीही आर्थिक मदत केली जाणार आहे.
पाकिस्तानीची कबुली
तर दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराचे ११ सैनिक मारले गेले आणि ७८ जखमी झाल्याचा कांगावा पाकिस्तानने मंगळवारी केला. ६-७ मेच्या मध्यरात्री भारताने केलेल्या हल्ल्यात ४० नागरिकांचा मृत्यू झाला व १२१ लोक जखमी झाल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या तीन दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले आहे. या तिन्ही संघटनांच्या ९ तळांना क्षेपणास्त्र हल्ल्यांनी उद्ध्वस्त केले आहे. India Pakistan Tension |
हेही वाचा:





