वॉशिंग्टन – पाकिस्तान आणि त्या देशातील नेत्यांची जगात आणि त्यांच्या स्वत:च्याच देशात काय प्रतिमा आहे, याचा आणखी एक नमुना वॉशिंग्टन येथील विमानतळावर पाहायला मिळाला.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्जाच्या बोलणीसाठी पाकिस्तानचे अर्थमंत्री इसाक दार आज येथे आले होते. त्यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत मसूद खान आणि अन्य बडे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
दार यांचे स्वागत केल्यावर ही मंडळी बाहेर जाऊ लागताच त्यांच्या मागे चोर चोर अशी घोषणाबाजी विमानतळावरच सुरू झाल्यामुळे पाकिस्तानला ब्रिटननंतर आणखी एका देशात नाचक्कीचा सामना करावा लागला आहे. ( Pakistan Finance Minister Ishaq Dar heckled, called ‘chor’ at US airport). काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या माहिती प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब यांनाही अशाच घोषणाबाजीचा लंडनच्या एका कॅफेत सामना करावा लागला होता.
Pakistan’s Finance Minister in U.S. 🤭 pic.twitter.com/bOKnM5AKmy
— Amrita Bhinder 🇮🇳 (@amritabhinder) October 13, 2022
याबाबतचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एक व्यक्ती दार यांना तुम्ही खोटारडे आणि चोर आहात असे म्हणताना दिसतो आहे. त्यावर भडकलेले दारही त्याला उद्देशून खोटारडा असे म्हणत असल्याचे दिसते आहे. त्यानंतर पाकिस्तानी दूतावासाचे अधिकारी दार यांना घेऊन तेथून निघून गेले.