“आमच्याकडे वाकड्या नजरेने बघाल तर…” पाकने इराणच्याही पाठीत खुपसला खंजीर

Pakistan on Iran-Israel war। पाकिस्तानने जगाला पुन्हा एकदा आपले रंग दाखवले आहेत. यावेळी त्यांनी जगात सुरु असणाऱ्या मोठ्या इराण आणि इस्रायलच्या युद्धात विश्वासघाताचे दर्शन घडवून आणले आहे.कारण काही काळापर्यंत इराणच्या बाजूने असणाऱ्या पाकने त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानने इराणला आश्वासन दिले आहे की जर इस्रायलने इराणवर अणुहल्ला केला तर पाकिस्तानही इस्रायलवर अणुहल्ला करेल” असा इराणीकडून एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच व्हिडिओवर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी प्रतिक्रिया देत व्हिडिओला खोटा आणि बनावट म्हटले आहे.
इशाक दार यांनी पाकिस्तानच्या संसदेत याविषयी भहस्य केले. त्यांनी यावेळी संसदेला संबोधित करताना,” सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक इराणी जनरल असा दावा करताना दिसत आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की असे काहीही घडलेले नाही आणि हे बेजबाबदार आणि खोटे वृत्त आहे. त्यांनी असेही सांगितले की, “हा खोटा दावा केवळ इंटरनेटवर पसरत नाही तर एका यूके मीडिया चॅनेलनेही त्यावर वृत्तांकन केले आहे जे बरोबर नाही.’ असे त्यांनी यावेळी म्हटले.
इशाक दार यांनी व्हायरल व्हिडिओला खोटा म्हटले आहे Pakistan on Iran-Israel war।
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी,”पाकिस्तानचे अणुधोरण १९९८ पासून तसेच आहे, त्यात कोणताही बदल झालेला नाही.” असे म्हटले. तसेच त्यांनी यावेळी बोलताना,पाकिस्तानने असे कोणतेही विधान केलेले नाही, जसे की व्हायरल व्हिडिओमध्ये दावा केला आहे. त्यांनी ते पूर्णपणे खोटे आणि बनावट असल्याचे म्हटले आहे. दार पुढे म्हणाले, “आमचे अणु धोरण स्वसंरक्षणासाठी आहे. आम्ही त्यावेळी हे स्पष्ट केले होते आणि आताही हेच धोरण आहे.
इशाक दार यांनी इस्रायलला इशारा दिला Pakistan on Iran-Israel war।
एका हिंदी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, “,इस्रायल पाकिस्तानकडे डोळे वर करूनही पाहू शकत नाही. वाईट हेतू असलेल्या कोणत्याही कृतीला प्रत्युत्तर देण्याची आमची पूर्ण शक्ती आहे. आमची सेना पूर्णपणे सतर्क आहे असा इराणने इस्रायलला इशारा दिला.
इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या व्हिडिओवर इस्रायल दार काय म्हणाले?
त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हायरल व्हिडिओचाही उल्लेख केला, ज्यामध्ये असा दावा केला जात होता की ट्रम्प यांनी पाकिस्तानला इस्रायल-इराण तणावापासून दूर राहण्यास सांगितले आहे. दार म्हणाले की, हा व्हिडिओ एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापरून बनवण्यात आला आहे आणि तो खरा नाही.” त्यांनी लोकांना खोट्या आणि असत्यापित बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि फक्त सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवावा असे आवाहन केले.





