IND vs PAK : भारत-पाक सामन्यापूर्वी पेटला नवा वाद! हारिस रौफच्या आक्षेपार्ह इशाऱ्याने चाहते संतप्त, VIDEO व्हायरल

सोशल मीडियावरील चाहत्यांच्या मते, हारिस रौफने यामागे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत भारताच्या 6 लढाऊ विमानांना पाडल्याचा पाकिस्तानी लष्कराचा दावा मांडण्याचा प्रयत्न केला. या कृतीमुळे हारिस रौफला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.
फहीम अशरफनेही केली होती अशीच कृती –
Haris Rauf and other Pakistani players shouting 6-0 before the India-Pakistan game.
Celebrating a victory that never happened shows the level of their IQ Level.
These beggars create fake reasons to fool their awam. pic.twitter.com/JGbHVuQOce
— Space Recorder (@1spacerecorder) September 21, 2025
हारिस रौफ हा पहिला पाकिस्तानी खेळाडू नाही, ज्याने अशी लज्जास्पद कृती केली आहे. यापूर्वी पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू फहीम अशरफनेही भारत मातेवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर करून सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. भारतीय खेळाडू मैदानावर याला प्रत्युत्तर देतात, तेव्हा पाकिस्तानी संघ क्रिकेटमध्ये राजकारण आणल्याचा आरोप करतो. यापूर्वीच्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने 7 गडी राखून एकतर्फी विजय मिळवला होता.
पाकिस्तानी संघाची नाराजी –
गेल्या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याने पाकिस्तानी संघ नाराज असल्याचे दिसून आले आहे. याच नाराजीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी खेळाडू मैदानावर आक्षेपार्ह वर्तन करताना दिसत आहेत.
हेही वाचा – Smriti Mandhana : ‘नॅशनल क्रश’ स्मृती मंधाना सुसाट! एकाच सामन्यात विराटच्या विक्रमासह मोडले ६ मोठे रेकॉर्ड
आता भारतीय संघ हारिस रौफ आणि पाकिस्तानी संघाला मैदानावर पराभूत करून प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. या घटनेमुळे भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीचा तणाव आणखी वाढला असून, चाहते या सामन्याकडे उत्सुकतेने पाहत आहेत.





