Haider Ali : क्रिकेट विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या क्रिकेटरला चालू सामन्यातून अटक, काय आहे प्रकरण?

मैदानावर सामना सुरू असताना केली अटक –
या घटनेमुळे पाकिस्तान क्रिकेट विश्वात खळबळ उडाली असून, चाहत्यांमध्येही निराशा पसरली आहे. हैदर अली हा उजव्या हाताचा फलंदाज असून, तो पाकिस्तान शाहीन संघासह इंग्लंड दौऱ्यावर होता. तो ३ ऑगस्टला इंग्लंड लायन्सविरुद्ध सामना खेळत होता. केंट काउंटीच्या बैकेनहॅम मैदानावर सामना सुरू असताना ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याचबरोबर त्याचा पासपोर्टही जप्त केला आहे.
23 जुलैला घडली होती घटना –
🚨 BREAKING:
Pakistani cricketer Haider Ali has been arrested in the UK on charges of raping a minor Christian girl.The incident has sent shockwaves through both the cricketing world and human rights circles.
More updates to follow. #HaiderAli #UKNews #BreakingNews… pic.twitter.com/krzfFOhnbo
— Ankit Rajput (@AnkitKu50823807) August 8, 2025
ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी 23 जुलै 2025 रोजी घडलेल्या बलात्काराच्या घटनेची पुष्टी केली. पोलिसांनी हैदर अली याचे नाव उघड केले नसले तरी एका 24 वर्षीय व्यक्तीला अटक झाल्याचे सांगितले. पुढील तपासापर्यंत हैदर अली याला जामिनावर सोडण्यात आले आहे. इंग्लंड आणि वेल्सच्या कायद्यानुसार, बलात्काराच्या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा आहे. दोषी आढळल्यास जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, तर सरासरी 15 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.
हेही वाचा – BCCI : बीसीसीआय नवीन प्रशिक्षकांच्या शोधात, सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ‘या’ तीन प्रमुख पदांसाठी मागवले अर्ज
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केले निलंबित –
🚨PCB ISSUES STATEMENT ABOUT HAIDER ALI’S INVOLVEMENT IN CRIMINAL CASE.
– PCB SUSPENDS HAIDER ALI!#HaiderAli pic.twitter.com/7GKXg4FxmQ
— Misran Ahmad 🏏Shahzadain 🇵🇰 (@MisranAhmad19) August 8, 2025
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तपास पूर्ण होईपर्यंत हैदर अली याला निलंबित करण्यात आले आहे. पीसीबीने कायदेशीर प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करण्याचे आणि हैदर अली याला कायदेशीर मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणामुळे पाकिस्तान क्रिकेट विश्वात खळबळ उडाली असून, तपास पूर्ण होईपर्यंत सर्वांचे लक्ष या घटनेच्या पुढील कार्यवाहीकडे लागले आहे.





