पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

India Vs Pakistan | पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूरची योजना आखण्यात आली. या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. 11 मे रोजी भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही दलाच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्सची (DGMO) संयुक्त पत्रकार परिषद झाली.
यात ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यात आली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकव्याप्त कश्मीर आणि पाकिस्तानातील 100 हून दहशतवादी आणि 40 सैनिक मारले गेल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा पाकिस्तानी नौदल, एअरफोर्स आणि सैन्य अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भारतासोबत झालेल्या संघर्षात त्यांचे एक लढाऊ विमान पाडले गेले अशी कबुली दिली. मात्र कोणत्या विमानाला किती नुकसान झाले याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. India Vs Pakistan |
पाक सैन्याचे प्रवक्ते लेफ्टिनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, ही पत्रकार परिषद ऑपरेशन बुनयान-उल-मरसूसची कारवाई आणि त्याच्या निष्कर्षावर आधारित आहे. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या विमानाचे नुकसान झाले. भारतासोबतच्या संघर्षात पाकिस्तानच्या एका विमानाच थोडं नुकसान झाले आहे. त्याबाबत सविस्तर माहिती शेअर करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले.
भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नाही
या पत्रकार परिषदेत त्यांनी कोणताही भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नसल्याचे देखील स्पष्ट केले. भारताकडून केलेल्या कारवाईला उत्तर देत पाकिस्तानी सैन्याने भारतातील २६ सैन्य तळांवर हल्ला केला. ज्यात वायूसेना आणि एविशन बेस यांचा समावेश होता असा पोकळ दावाही लेफ्टिनंट जनरल अहमद शरीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. India Vs Pakistan |
ऑपरेशन सिंदूर मोहिमेत दहशतवाद्यांची ठिकाणं टार्गेटवर
दरम्यान, भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी काल सायंकाळी ६:३० च्या सुमारास १ तास १० मिनिटांची पत्रकार परिषद घेत पाकिस्तानने पुन्हा कुरापत केली तर आता सोडलं जाणार नाही, असा इशारा दिला आहे. यावेळी डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन लेफ्टनंट जनरल राजीव घई, व्हाईस अॅडमिरल एएन प्रमोद आणि एयर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी ऑपरेशन सिंदूर मोहिमेत पाकिस्तानमध्ये केलेल्या कारवाईची माहिती दिली. India Vs Pakistan |
भारताच्या तीनही दलाच्या पत्रकार परिषदेत गेल्या तीन दिवसांत काय कारवाई करण्यात आली, याबाबत माहिती देण्यात आली. “भारताच्या ऑपरेशन सिंदूर कारवाईत केवळ दहशतवाद्यांची ठिकाणं टार्गेटवर होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये 3 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला. मुदस्सर खास, हाफिज जमील आणि युसूफ अझहर या दहशतवाद्यांचा खात्मा झाला. तसेच बहावलूर आणि मुरीदके दहशतवादी प्रशिक्षण केंद्र देखील आमच्या निशाण्यावर होते.
ऑपरेशन सिंधूरद्वारे ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या दरम्यान पाकव्याप्त कश्मीर आणि पाकिस्तानातील 100 हून दहशतवादी आणि 40 सैनिक मारले गेल्याची माहिती लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली. तसेच या दरम्यान भारताचे 5 शूर जवान शहीद झाल्याची माहिती त्यांनी दिली. India Vs Pakistan |
हेही वाचा:





