#PAKvsSA | पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला ३३ धावांनी हरवले! ‘या’ बाबतीत भारताला टाकले मागे

PAK vs SA – टी-२० विश्वचषकात गुरुवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा ३३ धावांनी पराभव केला. या विजयासह सुपर-१२ मधील गट-२ च्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. पाकिस्तान संघ आता ४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर बुधवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशविरुद्धच्या विजयामुळे भारत अव्वल स्थानावर आहे. आफ्रिकेविरुद्धच्या विजयामुळे पाकिस्तान संघाच्या सेमीफायनलच्या आशा कायम आहेत.
#Video । राहुल गांधी बनले क्रिकेटर! भारत जोडो यात्रेदरम्यान घेतला खेळाचा आनंद
विश्वचषकाच्या ३६व्या सामन्यात पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ९ गडी गमावून १८५ धावा केल्या होत्या. पावसामुळे दक्षिण आफ्रिकेला १४ षटकांत १४२ धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात आफ्रिका संघ निर्धारित षटकात ९ गडी गमावून १०८ धावाच करू शकला. सामन्यातील शादाब खानला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
सुपर-१२ च्या दोन्ही गटाच्या गुणतालिकांमध्ये गट-१ मध्ये न्यूझीलंड ५ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दुसर्या स्थानावर ५ गुणांसह इंग्लंडने ताबा मिळवला आहे. इंग्लंड संघाचा नेट रन रेट ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला असल्यामुळे यजमान संघ ५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आता कोणता संघ उपांत्य फेरीत पोहोचेल, हे सांगणे कठीण आहे.
Pakistan stay alive in the race to the #T20WorldCup semi-finals 👊
Standings 👉 https://t.co/cjmWWRz68E pic.twitter.com/JscjoLWNye
— ICC (@ICC) November 3, 2022
गट-२ मध्ये भारत संघ ६ अंकांसह पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानी ५ अंकांसह दक्षिण आफ्रिका आणि ४ अंकांसह तिसऱ्या स्थानी पाकिस्तान पोहोचला आहे. मात्र यामध्ये भारतीय संघाचे नेट रनरेट हे चांगले नाही. भारतापेक्षा आफ्रिका आणि पाकिस्तान संघांचे नेट रनरेट हे चांगले आहे. त्यामुळे भारताला सेमीफायनलमध्ये जाण्यास नेट रनरेट अडथळा ठरू शकते.





