मेलबर्न – ट्रॅव्हिस हेड हा सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे, ज्याने बॉर्डर-गावस्कर करंडक मालिकेमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह विरुद्ध दमदार कामगिरी केले आहे. त्याच्याकडे असलेल्या निडर दृष्टिकोनातूनच त्याला ही कामगिरी करणे शक्य झाले आहे, हीच खरी ऑस्ट्रेलियन खेळण्याची पद्धत असल्याचे मत दिग्गज क्रिकेटपटू ग्रेग चॅपल यांनी व्यक्त केले.
हेडने भारताविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये दोन शतके आणि एका अर्धशतकाच्या मदतीने 409 धावा केल्या आहेत आणि मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानावर आहे. कसोटी फलंदाज म्हणून हेडच्या यशामागे त्याचा साधेपणा आणि आक्रमकता आहे, असे मत चॅपेल यांनी व्यक्त केले.
सिडनी मॉर्निंग हेराल्डमधील आपल्या स्तंभात लिहिले, “सध्याच्या मालिकेत जसप्रीत बुमराहविरुद्ध हेडची कामगिरी हे त्याच्या निर्भय दृष्टिकोनाचे उदाहरण आहे. इतर फलंदाज बुमराहच्या वेगळी आणि वेगवान ऍक्शन, सातत्याने अचूक गोलंदाजी यांच्या विरोधात संघर्ष करतात, मात्र हेडने त्याला इतर गोलंदाजांच्या प्रमाणेच खेळले. त्यामुळे त्याला यशस्वी होता आले. हेडने मजबूतीने त्याचा सामना केला, त्याच्याविरुद्ध धावा केल्या, त्यामुळेच बुमराहची लय खराब केली, असा दावा देखील चॅपेल यांनी केला.