PAK vs BAN 2nd Test Day 4 Stumps : बांगलादेश इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, पाकविरूध्द विजयासाठी फक्त 143 धावांची गरज…

PAK vs BAN 2nd Test Day 4 Stumps : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रावळपिंडीत खेळवला जात आहे. पाकिस्तानचा दुसरा डाव अवघ्या 172 धावांवर आटोपला, त्यामुळे बांगलादेशसमोर आता दुसऱ्या डावात विजयासाठी 185 धावांचे लक्ष्य आहे. नझमुल शांतोच्या नेतृत्वाखाली बांगलादेश हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर तो इतिहास रचेल. आत्तापर्यंत बांगलादेश संघाने पाकिस्तानविरुद्ध एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही.
बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील पहिली द्विपक्षीय कसोटी मालिका 2002 मध्ये झाली होती. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये 6 मालिका खेळल्या गेल्या आहेत, मात्र प्रत्येक वेळी पाकिस्तान संघ विजयी झाला आहे. चालू मालिकेत बांगलादेशने पहिला सामना 10 विकेट्सनं जिंकला होता.
बांगलादेशविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत पाकिस्तानवर क्लीन स्वीप होण्याचा धोका आहे. रावळपिंडी येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी बांगलादेशने 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विकेट न गमावता 42 धावा केल्या असून त्यांना विजयासाठी आणि इतिहास रचण्यासाठी आणखी 143 धावांची आवश्यकता आहे.
Pakistan 🆚 Bangladesh | 2nd Test
Stumps – Day 04 | Bangladesh need 143 runs.PC: PCB#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/V2Omq2Pfyt
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 2, 2024
पाऊस आणि खराब प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा झाकीर हसन नाबाद 31 आणि शादमान इस्लाम नाबाद 9 धावांवर खेळत होते. बांगलादेश हा सामना जिंकण्याची शक्यता दिसत आहे. कारण पूर्ण एक दिवसाचा खेळ बाकी आहे. शेवटच्या दिवशी पावसामुळे सामन्यात कोणताही व्यत्यय आला नाही तर बांगलादेशचा संघ इतिहास रचू शकतो आणि 2 सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानचा पूर्णपणे सुपडा साफ होईल.
Paris Paralympics 2024 : भारताच्या नितेश कुमारचा ‘गोल्डन स्मॅश’; बॅडमिंटनमध्ये पटकावलं सुवर्णपदक…
बांगलादेशला मालिका विजयाच्या उंबरठ्यावर नेण्यात वेगवान गोलंदाजांचा मोठा वाटा होता. पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात पडलेल्या सर्व 10 विकेट्स बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी एका डावात सर्व 10 विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. बांगलादेशकडून हसन महमूदने 5, युवा वेगवान गोलंदाज नाहिद राणाने 4 आणि तस्किन अहमदने 1 बळी घेतला. पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात 46.4 षटकात 172 धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात पाककडून मोहम्मद रिझवानने 43 आणि आगा सलमानने 47 धावा जोडल्या. याव्यतिरिक्त कर्णधार शान मसूदने 28, सॅम अय्युबने 20 आणि बाबर आझमने 11 धावांचे योगदान दिले. अब्दुल्ला शफीक, खुर्रम शहजाद आणि सौद शकील यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
दरम्यान, पाकिस्तानने पहिल्या डावात 274 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशच्या संघाने 262 धावा केल्या होत्या. अशा प्रकारे पाकिस्तानने पहिल्या डावाच्या जोरावर केवळ 12 धावांची आघाडी घेत बांगलादेशला 185 धावांचे लक्ष्य दिले आहे.





