PAK vs BAN 2nd Test : लाजिरवाण्या पराभवानंतर पाक संघात बदल, ‘या’ दोन घातक खेळाडूंना मिळाली एन्ट्री…

Pakistan vs Bangladesh 2nd Test Playing 11 : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. आता पाकिस्तानने संघात बदल केले आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना रावळपिंडी येथे 30 ऑगस्टपासून खेळवला जाणार आहे. याआधी संघाने अबरार अहमद (Abrar Ahmed) आणि कामरान गुलाम (Kamran Ghulam) यांना संधी दिली आहे. अबरार हा घातक वेगवान गोलंदाज आहे तर कामरान अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत आहे.
वास्तविक, अबरार आणि कामरान यांना पाकिस्तान क्रिकेट संघातून रिलीज करण्यात आले होते. या कारणास्तव ते दोघेही पहिल्या कसोटीचा भाग नव्हते. मात्र आता या दोघांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. गोलंदाजी अष्टपैलू आमिर जमाललाही संघात स्थान मिळाले आहे. मात्र त्याचा फिटनेस पाहूनच त्याच्याबदल निर्णय घेतला जाईल, असं पाकिस्तान बोर्डानं सांगितले आहे.
JUST IN: Abrar Ahmed and Kamran Ghulam, who were released from Pakistan’s squad before the first #PAKvBAN Test, have joined the team for the second match, with pace-bowling allrounder Aamer Jamal also recalled. Jamal’s participation will be subject to fitness clearance pic.twitter.com/tU75PqTp4B
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 28, 2024
कामरानबद्दल सांगायचे तर, त्याने पाकिस्तानसाठी वनडे पदार्पण केले आहे. पण अजून कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याने 59 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आहे. कामरानने या फॉरमॅटमध्ये 4 हजार 377 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 16 शतके आणि 20 अर्धशतके केली आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 28 विकेट्सही घेतल्या आहेत.
अबरारबद्दल सांगायचे तर, त्याने पाकिस्तानसाठी 6 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 38 विकेट्स घेतल्या आहेत. अबरारने 3 टी-20 सामनेही खेळले आहेत. यामध्ये 2 बळी घेतले. आता तो बांगलादेशविरुद्धच्या रावळपिंडी कसोटीत खेळताना दिसणार आहे. अबरारने 23 प्रथम श्रेणी सामन्यात 125 विकेट घेतल्या आहेत. त्याने लिस्ट ए च्या 12 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत.
ICC Test Rankings 2024 : आयसीसी क्रमवारीत मोठा बदल ! विराट-यशस्वीला फायदा तर बाबर आझम पडला तोंडघशी…
दरम्यान, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना रावळपिंडी येथे खेळवला जाणार आहे. बांगलादेशने पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा पराभव केला होता. आता संघ मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.





