ICC Test Rankings 2024 : आयसीसी क्रमवारीत मोठा बदल ! विराट-यशस्वीला फायदा तर बाबर आझम पडला तोंडघशी…

ICC Test Batsman Rankings : आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार इंग्लंडचा फलंदाज जो रूट पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा केन विल्यमसन दुसऱ्या क्रमांकावर तर किवी फलंदाज डॅरिल मिशेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय ताज्या क्रमवारीत इंग्लिश फलंदाज हॅरी ब्रूकने 3 स्थानांची झेप घेतली आहे. आता हॅरी ब्रूकने चौथ्या क्रमांकावर कब्जा केला आहे. दुसरीकडे बांगलादेशविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तानच्या बाबर आझमच्या क्रमवारीत मोठी घसरण झाली आहे. याआधी बाबर आझम आयसीसी कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर होता, मात्र आता तो 9व्या स्थानावर घसरला आहे.
कोहली आणि जैस्वालला फायदा…
तर, भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांना क्रमवारीत फायदा झाला आहे. विराट कोहलीला 2 स्थानांचा फायदा झाला आहे. तर यशस्वी जैस्वालने क्रमवारीत 1 स्थानानं झेप घेतली आहे. याआधी विराट कोहली दहाव्या क्रमांकावर होता, मात्र आता तो आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल 8व्या स्थानावर होता, पण आता ताज्या क्रमवारीत तो 7व्या स्थानावर आला आहे.
Big shifts in the ICC Men’s Test Player Rankings following the #ENGvSL and #PAKvBAN matches 📈📉#WTC25 | Details 👇https://t.co/Tna2KVtZLH
— ICC (@ICC) August 28, 2024
टॉप-10 मध्ये 3 भारतीय फलंदाजांचा समावेश…
आयसीसी कसोटी क्रमवारीत टॉप-10 मध्ये 3 भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. ज्यामध्ये विराट कोहली आठव्या, यशस्वी जैस्वाल सातव्या आणि रोहित शर्मा सहाव्या स्थानावर आहे.
त्याचबरोबर पाकिस्तानविरुद्ध 191 धावांची शानदार खेळी खेळणारा बांगलादेशचा फलंदाज मुशफिकुर रहीमने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. आता मुशफिकुर रहीम आयसीसी कसोटी क्रमवारीत 17 व्या स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वी तो 25 व्या क्रमांकावर होता. अशाप्रकारे बांगलादेशच्या यष्टीरक्षक फलंदाजाने 7 स्थानांची झेप घेतली आहे.





