मानसीचा चित्रकार तो…

Updated On:

पुणे –  10 जानेवारी ते 12 जानेवारी 2021 बालगंधर्व कलादालन शिवाजीनगर पुणे
कलाकारांची निर्मिती प्रक्रिया सातत्याने सुरूच असते. नवी माध्यमे, नवे प्रयोग याद्वारे कलाकार आपल्याला व्यक्त करत असतो. केवळ व्यावसायिक कलाकारच नवेतर अगदी हौशी कलाकारही व्यवसायात असले तरी निर्मितीप्रक्रियेत रमून गेलेले असतात. या कलाकारा मध्ये असा एक मोठा समुदाय आहे तो म्हणजे कला शिक्षकांची कला शिक्षण घेऊन प्राथमिक माध्यमिक शाळेत अध्यापनाचे काम करीत असतानाच कलाकार म्हणून स्वतःचे स्थान कलाक्षेत्र निर्माण करण्यासाठी काही त्याला शिक्षक सातत्याने काम करीत असतात.

महाराष्ट्रातील प्रशिक्षित कला शिक्षकांची संस्था इतर राज्यांपेक्षा खूपच मोठी आहे या शिक्षकांचे शालेय स्तरावर अनेक उपक्रम सुरु असतात. कला शिक्षक संघटना ही आपल्या स्तरावर अनेक कला विषयक गोष्टी करत असतातच पण तरीही प्रत्येक कलाकाराला आपण केलेलं काम रसिकांसमोर प्रदर्शित करावे असे मनोमन वाटत असतात.

रंग सप्तक हा असाच क्रियाशील कला शिक्षकांचा समूह सातत्याने काम करत असतो पुण्यातील नामवंत शाळातून हे कला शिक्षक अतिशय उत्तम काम करीत आहेत उत्तम शिक्षक कायम स्वतःला अद्यावत करत असतो कला शिक्षकांच्या हा समूह सुद्धा उत्तम कला शिक्षकां प्रमाणेच उत्तम कलाकार म्हणून काम करीत आहेत.

रंग सप्तक या समूहातील प्रत्येक कलाकाराचे काम अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे.यात निसर्ग चित्रे रचनाचित्र अमूर्त शैलीतील चित्रे गड किल्ल्यांची चित्रे काही सर्जनात्मक चित्रे अशा विविधरंगी कलाविष्कार यांचे दर्शन घडते वेगवेगळे माध्यमे आणि प्रयोगा यातून रूढ चित्रशैली पेक्षा वेगळी अभिव्यक्ती करण्याचाही प्रयत्न काही कलाकारांनी केला आहे.

दिलीप पवार हा कलाकार पवार पब्लिक स्कूल नांदेड सिटी येथील कलाशिक्षक विभाग प्रमुख म्हणून काम करतो आहे. शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम सातत्याने करणारा शिक्षक अशी ओळख आहे या प्रदर्शनात दिलीप पवारांची अमूर्त शैलीतील चित्रे आहेत.अमूर्त शैलीत काम करणे हे थोडं अवघड काम आहे कारण अमूर्तता हाही एक विचार आहे. त्याची सुरुवात वास्तव तेथूनच होते. नुसते रंग पासून वा वेडेवाकडे फटकारे मारून अमूर्त कलाकृती तयार होत नाही. उत्तम रंग योजना रचना पोत इत्यादी सर्वांचे म्हणजेच कलेच्या मुलं तत्त्वांचे सुयोग्य सादरीकरण म्हणजे अमूर्त कलाकृती.

दिलीप पवार यांनी आपल्या कलाकृती संदर्भात खूप विचार केलेला आहे. अमूर्त चित्रकलेची दृक भाषा आहे. ती लक्षात घेतली तरच अमूर्त चित्रं चा आनंद घेता येतो. अशा अमूर्त कलाकृतीकडे तुम्ही अतिशय तन्मयतेने पाहत गेलात तर हळू हळू त्यामधील मूर्त स्वरूप लक्षात येऊ लागेल.
पवार यांच्या अमूर्त कलाकृती पाहताना आज अनुभव मिळेल आपण नक्की काय करतोय आणि नेमके कुठे जायचे आहे ज्या कलाकाराला समजले असेल तोच अमूर्त शैलीत अविष्कार करू शकतो.
दिलीप पवार यांच्याकडे ती समज निश्चित पणे आहे.

हरेश पैठणकर हा कलाशिक्षक आपले सर्व व्याप कर्तव्य संभाळून गड-किल्ल्यांवर नियमित भटकंती करणारा कलाकार आहे गड-किल्ल्यांचे भव्य मनोहर आणि रुद्र रूप ही मनात साठवून ठेवलेला कलाकार स्वतःला व्यक्त करताना ही गड-किल्ल्यांचा विचार करतो आजवरच्या प्रदर्शनात याचा अनुभव वरील कलाकृती त्यांनी प्रदर्शित केल्या आहेत.

हरेश च्या चित्रात गड किल्ल्यांचे नुसते चित्र नाही तर त्यांच्या भावना ही त्यात जाणवतात भव्य प्रवेशद्वारे तटबंदी बुरुज रुद्र रूप दाखवणारे डोंगर-कडे याबरोबर दुरुन दिसणारे किल्ल्यांचे मनोहारी दृश्य ही हवेच्या चित्रात दिसते याच बरोबर कलाकार आपले माध्यम कसे आणि किती प्रगलभतेन वापरतो हे सुद्धा हरेश च्या चित्रात दिसते.

संदीप शेटे या कला शिक्षकांने गेल्या वीस वर्षात अनेक ऐकलं व समूह प्रदर्शने केली आहेत संदेशच्या म्हणण्यानुसार निसर्ग आणि त्याच्या कामाची प्रेरणा आहे त्यांची निसर्गचित्रे प्रचलित निसर्गचित्र पेक्षा थोडी वेगळी आहेत समोर दिसणारे दृश्य चित्रीत करण्यात त्या दृष्या वरील अंतर मला मधील प्रतिक्रीया संदेश च्या निसर्ग चित्रात आहे. निसर्गाचित्रातील झाडेझुडपे प्रकाश छाया या सर्व गोष्टी संधीच्या चित्रात थोड्या सृजनात्मक पद्धतीने दाखविल्या आहेत चित्रातील रेंडरिंग हे छोट्या-छोट्या भटकर यांचे आहे चित्रातील तपशील पेक्षा वातावरण निर्मिती व संदेश चा भर दिसतो.

मोहन चार्य हे खडकीच्या जी एम आय कन्या शाळा मध्ये कला शिक्षक असून निसर्गचित्र हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे मोजक्या आणि उष्ण रंगसंगती मध्ये त्यांची चित्रे रंगांनी दिसतात. निसर्गाची विविध रूपे दाखविताना चित्र रचना पारदर्शी किंवा अपारदर्शी रंगाची हाताळणी अतिशय उत्कृष्टपणे करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. झाडे पाणी आकाश अशा गोष्टी दाखविताना रंगांचा प्रवाहीपणा आणि तेजस्वीपणा यांचा सुरेख वापर त्यांच्या कामात दिसतो. जेही जवळच्या हो ड्या हे चित्र म्हणजे जल अंगावरील त्यांचे प्रभुत्व दाखविणारे आहे.

राजेंद्र अ तकर हे खडकीच्या आलेगावकर शाळेतील निवृत्त कला शिक्षक असून त्यांची खासियत थर्माकोल मधील शिल्पांची आहे ते कवी आहेत या प्रदर्शनात त्यांनी एक वेगळ्या शैलीतील चित्रे प्रदर्शित केली आहेत त्यांची शैली ही भोमितिक आणि डिझाईन स्वरूपातील आहे नेहमीच्या निसर्ग चित्र पेक्षा वेगळी चित्रे पाहायला ख तच आवडेल. अवधूतकरांच्या चित्रातील घटक रचना आणि उजळ पारदर्शी जलरंग आकर्षित करतात.

प्रदर्शनातील सहभागी साथ कलाकारांपैकी मोहन देशमुख निसर्ग चित्र साठी प्रसिद्ध आहे. परंतु या प्रदर्शित केले आहे मोहन देशमुखांच्या कामात पेन ड्रॉईंग बरोबरच मुद्राचित्र प्रमाणिक परिणाम दाखविला आहे कथनात्मक विषय ाळ्यापांढर्‍या अशा मोजक्या गटातून साधलेल परिणाम त्यांची कलाविषयक समज दाखविणारा आहे अगदी संस्थेने बारीक-बारीक घटांमध्ये तपशील चित्रित करून माध्यमाचा वरील समर्थ पकड त्यांच्या चित्रात दिसते सध्या ते अहिल्या देवी गर्ल्स स्कूल मध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

हनुमंत तोडकर हे न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड या शाळेत कला शिक्षक आहेत एक अभ्यासू उपक्रम शील शिक्षक विवेकानंदांवर शेकडो व्याख्याने देणारा हा कलाकार आपल्या चित्रातही भारतीय तत्त्वज्ञानाचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना दिसते. ऍक्रेलिक आणि टेस्टमधील त्यांनी काम केले आहे. कलेचा मूलतत्त्वं वर आधारित चित्रांमध्ये एक वेगळा विषयाला महत्त्व देणारा मुक्त अविष्कार दिसतो. मनातील संकल्पना मूर्त स्वरूपात साकार करताना काही प्रतीके त्यांनी चित्रात वापरली आहेत पिंजरा पक्षी सूर्य मानवी चेहरा मोरपीस अशा प्रतीकांचा वापर करून साध्या पद्धतीने तोडकर यांनी त्यांची चित्र साकरली आहेत. प्रा. सुधाकर चव्हाण.

आणखी संबंधित बातम्या

Big Scam : 2143 कोटींच्या महाघोटाळ्यात पुणे कनेक्शन उघड; खासगी बँकेतून 200 कोटी परदेशात, मुख्य सूत्रधार अखेर शरण

2026-08-24 18:27:57

Big Scam : 2143 कोटींच्या महाघोटाळ्यात पुणे कनेक्शन उघड; खासगी बँकेतून 200 कोटी परदेशात, मुख्य सूत्रधार अखेर शरण

Sandeep Singh Gill : अधिकारी व अमलदारांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद; पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी बदल्यांना दिली मंजुरी

2026-08-24 17:51:11

Sandeep Singh Gill : अधिकारी व अमलदारांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद; पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी बदल्यांना दिली मंजुरी

Cabinet Meeting : फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय; राज्याला मिळणार आणखी एक न्यायालय, 'या' जिल्ह्याना मोठा फायदा

2026-08-24 17:30:09

Cabinet Meeting : फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय; राज्याला मिळणार आणखी एक न्यायालय, 'या' जिल्ह्याना मोठा फायदा

Pune Politics : भाजप- राष्ट्रवादीत लेटर वाॅर सुरूच; राष्ट्रवादीचे आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

2026-08-24 15:29:05

Pune Politics : भाजप- राष्ट्रवादीत लेटर वाॅर सुरूच; राष्ट्रवादीचे आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

polling station: मतदान केंद्रांची संख्या कमी होणार

2026-08-24 08:27:34

polling station: मतदान केंद्रांची संख्या कमी होणार