Pahalgam Attack : जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एक पाकिस्तानी घुसखोर जाळ्यात
Updated On:

जम्मू – भारतीय लष्कराने मंगळवारी एका पाकिस्तानी घुसखोराला पकडले. ती कारवाई जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत करण्यात आली. घुसखोर पाकव्याप्त काश्मीरचा रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले.
त्याने एलओसी ओलांडून भारतीय हद्दीत पूॅंच जिल्ह्यातील भागात शिरकाव केला. त्याला सतर्क असणाऱ्या लष्करी जवानांनी तातडीने ताब्यात घेतले.
प्राथमिक तपासणीवेळी घुसखोराकडे कुठली आक्षेपार्ह सामग्री आढळली नाही. याआधी पंजाबमध्ये सीमेलगत एका पाकिस्तानी घुसखोराला पकडण्यात आले. ती कारवाई सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) केली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर एलओसी आणि सीमेलगत तैनात असणारी भारतीय सुरक्षा दले आणखीच सज्जता आणि सतर्कता बाळगून आहेत. दहशतवाद्यांना घुसखोरीची संधी मिळू नये यासाठी सुरक्षा दले पूर्ण दक्ष आहेत.





