IPL 2026 opening ceremony : आयपीएल सुरु होण्यापूर्वीचा बीसीसीआयचा मोठा निर्णय! यंदाची ओपनिंग सेरेमनी रद्द; नेमकं कारण काय?
IPL 2026 opening ceremony : आयपीएल २०२६ चा बिगुल २८ मार्चपासून वाजणार असला तरी, यंदा क्रिकेट चाहत्यांना एका मोठ्या बदलाला सामोरे जावे लागणार आहे.

BCCI cancels IPL 2026 opening ceremony : आयपीएलच्या १९ व्या हंगामाची सुरुवात यंदा रंगारंग कार्यक्रमांशिवाय होणार आहे. ४ जून २०२५ रोजी आरसीबीच्या जेतेपदाच्या जल्लोषादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत ११ चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला होता. या मृतांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि त्यांच्या सन्मानार्थ बीसीसीआयने यंदाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
काय म्हणाले बीसीसीआय सचिव?
बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले की, “गेल्या वर्षीच्या दुर्दैवी घटनेमुळे यंदा कोणताही सांस्कृतिक किंवा मनोरंजन कार्यक्रम होणार नाही. मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ३१ मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याच्या दिवशी एक भव्य ‘क्लोजिंग सेरेमनी’ आयोजित करण्याची आमची योजना आहे.”
आरसीबीची श्रद्धांजली: ११ जागा राहणार रिकाम्या IPL 2026 opening ceremony

IPL 2026 opening ceremony : आयपीएल सुरु होण्यापूर्वीचा बीसीसीआयचा मोठा निर्णय! यंदाची ओपनिंग सेरेमनी रद्द; नेमकं कारण काय?
आपल्या चाहत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आरसीबीने खास पाऊल उचलले आहे. आगामी हंगामातील प्रत्येक सामन्यापूर्वी सराव करताना आरसीबीचे खेळाडू ‘११’ नंबरची जर्सी परिधान करतील. तसेच, एम. चिन्नास्वामी स्टेडियममधील ११ जागा (Seats) या मृतांच्या आठवणीत संपूर्ण हंगामभर रिकाम्या ठेवल्या जाणार आहेत. २०२५ मध्ये पंजाब किंग्सला हरवून आरसीबीने १८ वर्षांचा दुष्काळ संपवला होता, पण त्यानंतर झालेल्या दुर्घटनेमुळे संघावर मोठी टीका झाली होती.
सुरक्षेसाठी ७ कोटींचा खर्च आणि AI तंत्रज्ञान – IPL 2026 opening ceremony
पुन्हा अशी दुर्घटना घडू नये यासाठी आरसीबी प्रशासनाने कंबर कसली आहे. गर्दी व्यवस्थापनासाठी (Crowd Management) संघाने सुमारे ७ कोटी रुपये खर्च केले आहेत.
- ‘जार्विस’ AI प्रणाली: संपूर्ण स्टेडियममध्ये एआय-आधारित सीसीटीव्ही लावले आहेत, जे ‘रिअल-टाइम’ मध्ये गर्दीची माहिती देतील.
- थेट नियंत्रण: या सीसीटीव्ही फुटेजचा ताबा थेट पोलीस आयुक्तांकडे असेल.
- कमांड सेंटर: स्टेडियम परिसरात बॅगेज स्कॅनर आणि हाय-टेक कमांड सेंटर उभारण्यात आले आहेत.





