Ozar News : श्री क्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहर गणरायाचा जन्मोत्सव उत्साहात संपन्न
Ozar News : अष्टविनायकांपैकी प्रमुख पीठ असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहर गणरायाचा जन्मोत्सव सोहळा आज दुपारी ठीक १२:३० वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत, फुलांची उधळण आणि ढोल-ताशांच्या गजरात अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.

Ozar News : श्री क्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहर गणरायाचा जन्मोत्सव सोहळा आज दुपारी ठीक १२.३० वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत फुलांची उधळण करत मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. (Ozar News)
श्री गणरायाच्या जन्मोत्सवाचा शुभक्षण येताच मंदिर परिसरात उपस्थित भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने फुलांची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण श्री क्षेत्र ओझर दुमदुमून गेले. फुलांच्या वर्षावात श्री विघ्नहर गणरायाचा जन्मोत्सव साजरा झाल्याने परिसरातील वातावरण अत्यंत मंगलमय व भक्तिमय झाले. (Ozar News)
या शुभमुहूर्तावर सकाळी ठीक ५ वाजता श्रींचे मंदिर उघडण्यात आले. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाच्या वतीने श्रींचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर ठीक ७ वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. (Ozar News)
यावेळी उमाताई रघुनाथ कवडे, अरुणा नंदाराम नलावडे, प्रिती राहुल लांडगे, सारिका सचिन घेगडे आणि नलिता सागर घेगडे हे यजमान म्हणून लाभले. महाआरतीच्या मान्यवर यजमानांचा सत्कार देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आला. (Ozar News)
चौथा द्वार आंबेराई येथे उत्साहात
जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज चौथा द्वार आंबेराई, ओझर (जगदाळे मळा) येथे पार पडला. सकाळी ठीक १० वाजता श्री विघ्नहर मंदिरातून पालखी आंबेराईच्या दिशेने प्रस्थान झाली. आंबेराई येथील मंदिरात पृथ्वी-सूर्य पूजा व विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ठीक १२ वाजता पालखीचे श्री विघ्नहर मंदिरात आगमन झाले. (Ozar News)
दरम्यान, सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ह.भ.प. शिवचरित्रकार देवगिरी महाराज कोपरगावकर यांचे श्री गणेश जन्माचे कीर्तन संपन्न झाले.सायंकाळी ठीक ३ ते ६ या वेळेत सामूहिक शेरण्या व दंडवते हा धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. (Ozar News)
ताशांच्या गजरात आहेर स्वीकार
उंब्रज, धनेगाव, शिरोली खुर्द आणि आंबेराई या ठिकाणांहून श्री विघ्नहर गणरायाला आलेले आहेर ताशांच्या गजरात स्वीकारण्यात आले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण कवडे व विश्वस्त मंडळाच्या वतीने संबंधित मान्यवर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. (Ozar News)
विकासकामांसाठी दानशूर भाविकांचे योगदान
श्री विघ्नहर गणरायाच्या जन्मोत्सवाच्या शुभदिनी अनेक दानशूर भाविकांनी देवस्थान ट्रस्टच्या विकासकामांसाठी देणगी देऊन आपले योगदान दिले. त्यामध्ये तुषार मोहन गायकवाड २ लाख ५१ हजार, दीपक प्रभाकर कवडे व दीपक रामचंद्र जाधव प्रत्येकी ११ हजार १११, शिवाजी मोरे ११ हजार दिले. या दानशूर भाविकांचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने आभार मानण्यात आले. (Ozar News)
यावेळी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनील घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे, विश्वस्त प्रकाश मांडे, सुर्यकांत रवळे, गोविंद कवडे, विक्रम कवडे, संतोष कवडे, समीर मांडे, विनायक मांडे, विनायक जाधव, मंगेश पोखरकर, विलास कवडे, शिल्पा जगदाळे सर्व भाविक भक्तांना श्रींच्या जन्मोत्सव यात्रेस उपस्थित राहण्याचे आवाहन व निमंत्रण दिले. फुलांची उधळण, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने श्री क्षेत्र ओझरचा परिसर भक्तिमय झाला. (Ozar News)
Ozar News : श्रीक्षेत्र ओझर येथे तिसरे पश्चिमद्वार उत्साहात; शिरोली खुर्द येथे रती-कंदर्प पूजा





