Arvind Kejriwal : ‘नरेंद्र मोदी धृतराष्ट्र बनले..’; देणगी चोरीप्रकरणी केजरीवाल यांचा गंभीर आरोप
पंतप्रधान मोदी महाभारतातील धृतराष्ट्र बनले होते, असा आरोप आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

Arvind Kejriwal – रामजन्मभूमी मंदिराला दिलेल्या देणग्यांमधील कथित अनियमिततेची माहिती इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) पंतप्रधानांना दिली होती. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
याचाच अर्थ पंतप्रधान मोदी महाभारतातील धृतराष्ट्र बनले होते, असा आरोप आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. प्रभावशाली लोकांना वाचवण्यासाठी संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला. ( Arvind Kejriwal)
अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले, देणगी चोरी प्रकरणात उच्चपदस्थ व्यक्तींना अटक केली जाईल का? पैसे पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचले की नाही हे मी सांगू शकत नाही, पण घटनाक्रमावरून हे स्पष्ट होते की त्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.
पंतप्रधानांनी स्वतः ट्रस्टची स्थापना केली, त्यांचेच लोक यात सामील आहेत आणि चंपत राय हे त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक मानले जातात.
केजरीवाल यांनी ट्रस्टच्या जमीन खरेदी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका कुटुंबाने त्यांच्या पक्षाशी संबंधित एका व्यक्तीला अंदाजे २ कोटी रुपयांची जमीन विकली आणि काही मिनिटांनंतरच तीच जमीन ट्रस्टने १८ कोटी रुपयांना खरेदी केली. (Arvind Kejriwal)
९ कोटी रुपयांची जमीन ५५ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली. ही कागदपत्रे सार्वजनिक असून सर्वांसाठी उपलब्ध आहेत, असेही केजरीवाल म्हणाले.
एस आयटीची स्थापना हीच दिशाभूल : (Arvind Kejriwal)

Arvind Kejriwal : ‘नरेंद्र मोदी धृतराष्ट्र बनले..’; देणगी चोरीप्रकरणी केजरीवाल यांचा गंभीर आरोप
केजरीवाल यांनी असा आरोप केला की, मंदिराच्या बांधकामात सहभागी असलेल्या अभियंत्यांनी ४० टक्क्यांपर्यंत कमिशनची मागणी केली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ४० दिवसांत चोरीच्या ७० घटना रेकॉर्ड झाल्या होत्या, परंतु मागील आठ महिन्यांचे सीसीटीव्ही फुटेज हटवण्यात आले.
देशभरातील कोणत्या मतदान केंद्रातून कोणाचे मत हटवायचे हे पंतप्रधानांना माहीत आहे, पण इतके दिवस सुरू असलेल्या चोरीबद्दल ते अनभिज्ञ कसे होते?




