OTT Release : जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ‘या’ सीरिज-फिल्म OTT वर होणार रिलीज

मुंबई : सध्या OTT ची क्रेझ लोकांमध्ये दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे. ओटीटी हे प्रेक्षकांसाठी खूप सोयीस्कर प्लॅटफॉर्म असून कधीही, कुठेही, हवी ती आवडीची मूव्ही-सीरिजचा आनंद घेऊ शकतात. त्यामुळे आता प्रेक्षकांचा अधिक कल ओटीटीकडे पाहायला मिळत आहे. यादरम्यान ओटीटी लव्हर्ससाठी एक खास बातमी समोर आली आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात अनेक सस्पेन्स, थ्रिलरने भरलेल्या सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया सिरीजबद्दल..
1) शार्क टँक इंडिया सीझन 4
ओटीटी प्लॅटफॉर्म- सोनी लिव्ह – भारतातील प्रसिद्ध बिझनेस रिॲलिटी शो “शार्क टँक इंडिया” सीझन 4 सह पुनरागमन करत आहे. नेहमीप्रमाणे, हा शो 6 जानेवारीपासून म्हणजेच OTT प्लॅटफॉर्म Sony Liv वर प्रसारित झाला. नुकत्याच सुरू झालेल्या या शोचा तुम्ही आनंद घेऊ शकता. तुमच्या बिझनेसविषयीच्या आवडीला या शोने आणखी प्रोत्साहन मिळेल.
2) ब्रेकथ्रू
पीटर एगर्स, मॅटियास नॉर्डक्विस्ट स्टारर 7 जानेवारी 2025 पासून रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्सवर तुम्ही याचा आनंद लुटू शकता. “द ब्रेकथ्रू” ही हॉलिवूडची क्राइम ड्रामा सीरीज आहे जी एका रहस्यमय खुनाच्या तपासाभोवती फिरते. या सीरिजची कथा सस्पेन्सने भरलेली आहे.
3) साबरमती रिपोर्ट
विक्रांत मॅसी, राशी खन्ना, रिद्धी डोगरा स्टारर हा सिनेमा 10 जानेवारी 2025 ला ओटीटीवर रिलीज होणार आहे. अभिनेता विक्रांत मॅसीचा चित्रपट “द साबरमती रिपोर्ट”, 15 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, त्याला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता हा चित्रपट ऑनलाइन रिलीजसाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. 10 जानेवारीपासून तो Zee5 वर प्रसारित होणार आहे.
4) गूजबंप्स: द व्हॅनिशिंग
डेव्हिड श्विमर, जेडेन बार्टेल्स, सॅम मॅकार्थी स्टारर ही सीरिज 10 जानेवारी 2025 पासून ओटीटीवर येत आहे. तुम्ही अँथॉलॉजी हॉरर थ्रिलर्सचे चाहते असाल तर “गूजबंप्स: द व्हॅनिशिंग” तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे. “Goosebumps” चा दुसरा सीझन या आठवड्याच्या मोस्ट अवेटेड सीरिज आहे. ही वेब सिरीज 10 जानेवारीपासून प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर प्रदर्शित होणार आहे.
5) ब्लॅक वॉरंट
जहाँ कपूर, राजश्री देशपांडे, राहुल भट्ट स्टारर ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर येत आहे. तुम्हाला तिहार जेलची आतली कहाणी “ब्लॅक वॉरंट” या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळेल, जी याच नावाच्या पुस्तकावरून प्रेरित आहे. या सीरिजमध्ये तुरुंग अधिकाऱ्याची कथा दाखवण्यात आली आहे. ही मालिका साहसी आणि थ्रिलरने भरलेली आहे.





