मोठा खुलासा : लादेनला जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनताना पहायची होती इच्छा, 2010 मध्येच दिला होता ‘हा’ इशारा

वृत्तसंस्था – अमेरिकेवर 11 सप्टेंबर 2001 रोजी आंतकी हमल्या मागचा मास्टर माईंड ओसामा बिन लादेन मे 2011 मध्ये पाकिस्तान मध्ये मारला गेला. मरणाच्या एक वर्ष आधी लादेनने एक भले मोठे पत्र लिहून ठेवले होते. या पत्रामध्ये बायडन यांचा उल्लेख केला गेला होता. तेव्हा बायडन ओबामा सरकामध्ये उपराष्ट्राध्यक्ष होते. दरम्यान लादेनच्या या चिठ्ठीमध्ये मोठा खुलासा करण्यात आला आहे.
अफगानिस्तान मधून अमेरीकी सैन्य वापस घेतल्याबरोबर तेथे तालिबान्यांनी कब्जा केला आहे. तेव्हापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर टीका होत आहे. बोलले जात आहे की, त्याचा हा निर्णय केवळ अफगानिस्तानसाठीच नाही तर अमेरिकेसाठी सुद्दा एक नवे संकट घेऊन आला आहे.
असे असताना एका रिपोर्टनुसार अलकायदा प्रमुख ओसामा बिन लादेन द्वारा 2010 मध्ये लिहीलेल्या एका चिठ्ठीचा खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की, लादेनने बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनण्याचा उल्लेख केला होता. सोबतच बायडनच अमेरिकेसमोर मोठे संकट उभे करतील असेही लादेन याने पत्रात लिहून ठेवले होते. ओसामाचा असा विश्वास होता की बायडन एक अक्षम राष्ट्राध्यक्ष सिद्ध होतील.





