US Donald Trump: व्हाइट हाऊस कॉरेस्पॉन्डंट्स डिनरमध्ये अंदाधुंद गोळीबार ; डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित काढले बाहेर
US Donald Trump: अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असताना ही घटना घडली आहे.

US Donald Trump: अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असताना ही घटना घडली आहे.
शनिवारी रात्री मोठ्या गोळीबाराचे आवाज ऐकू आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनरमधून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. संशयित हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले अधिक तपास केला जात आहे. मात्र या घटनेने मोठी खळबळ उडाली.
एएफपीने एका कॅबिनेट सदस्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुदार, जेवणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार झाला, परंतु यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि इतर वरिष्ठ नेत्यांना सुरक्षेसाठी तात्काळ बाहेर काढण्यात आले.
🚨 BREAKING: Trump RUSHED Off Stage After Reports Of Shots Fired Inside The Room At White House correspondents Dinner pic.twitter.com/06Nwrgujuo
— Mr Producer (@RichSementa) April 26, 2026
सोशल मीडियावर काही व्हिडिओंमध्ये मोठा आवाज ऐकू आल्याचा दावा करण्यात आला आहे, मात्र या व्हिडिओंची सत्यता अद्याप सिद्ध झालेली नाही. समोर आलेल्या वृत्तानुसार, आवाजानंतर उपस्थित लोकांना बाहेर काढण्यात आले आणि परिसर सील करण्यात आला.
संशयित ताब्यात US Donald Trump:
एएफपीनुसार, या घटनेनंतर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, तो आवाज कशामुळे आला, तो खरंच गोळीबाराचा होता की आणखी काही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या तपास सुरू असून, सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या घटनेनंतर, कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांच्या सुरक्षेबद्दलही प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.
कार्यक्रमात ट्रम्प यांच्यासोबत इतरही उपस्थित US Donald Trump:
सीएनएनच्या वृत्तानुसार, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स हे ट्रम्प यांच्यासोबत मुख्य टेबलावर उपस्थित होते. अनेक कॅबिनेट मंत्री आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. प्रशासनातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, कॅबिनेटमधील कोणत्याही सदस्याला इजा झाली नाही. हे भोजन विशेष होते कारण राष्ट्राध्यक्ष म्हणून
डोनाल्ड ट्रम्प यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती. हा एक असा कार्यक्रम आहे जिथे सहसा माध्यम, राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती एकत्र येतात, परंतु ट्रम्प आणि माध्यमांमधील दीर्घकाळापासूनच्या तणावपूर्ण संबंधांमुळे हा कार्यक्रम आधीच चर्चेत होता.





