Jagdeep Dhankhar : राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा सोमवारी 10 वा दिवस होता. बांगलादेश हिंसाचारासह विविध मुद्द्यांवर आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही प्रचंड गदारोळ झाला. दरम्यान, राज्यसभेत विरोधी पक्ष अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. राज्यघटनेच्या कलम ६७ (बी) अंतर्गत विरोधी पक्षाचे खासदार अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत. यासाठी अनेक विरोधी खासदारांनीही या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्या असल्याचे सांगण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसचे खासदारही राज्यसभेच्या अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या बाजूने आहेत.तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार म्हणाले की, काँग्रेसने यासाठी पुढाकार घेतला तर बरे होईल.राज्यसभेच्या अध्यक्षांना हटवण्यासाठी प्रस्तावावर ५० सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक आहेत.संसदेच्या गेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी अध्यक्षांना हटवण्याचा प्रस्ताव आणल्याची तयारी सुरू केल्याची चर्चा होती,मात्र नंतर विरोधकांनी माघार घेतली.
दरम्यान, आज तीन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर दुपारी तीन वाजता सभागृहाची बैठक सुरू असतानाही सभागृहात गोंधळ सुरूच होता. यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यादरम्यान विरोधी पक्षातील काही सदस्य जागेवरून पुढे आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. सभागृहात गदारोळ सुरूअसतानाच सभापती जगदीप धनखड म्हणाले की त्यांनी सभागृह नेते जेपी नड्डा आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी त्यांच्या चेंबरमध्ये बैठक घेतली.
या वेळी इतर अनेक ज्येष्ठ सदस्यही उपस्थित होते. उद्या मंगळवारी सकाळी त्यांच्या दालनात या नेत्यांची दुसरी बैठक होणारअसल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षांनी सभासदांनाआत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू देण्याचे आवाहन केले. मात्र, सभागृहात गोंधळ सुरूच होता.त्यानंतरअखेरसभापतींनीदुपारी ३.१० वाजता सभागृहाचेकामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.





