“फोन बूथ’मधून काहीतरी नवीन करण्याची संधी – ईशान खट्टर

बॉलीवूडमधील यंगस्टार ईशान खट्टर आपल्या आगामी “फोन बूथ’ चित्रपटातून विनोदी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे आणि यासाठी तो खूपच रोमांचित आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, खरचं, यासाठी मी खूपच रोमांचित आहे. तसेच माझा मित्र सिद्धांत (चतुर्वेदी) सोबत काम करण्यासाठी मी उत्साहित आहे.
ईशान खट्टर म्हणाला, या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर ती मला फारच आवडली आणि मी चित्रपटास होकार दर्शविला. “फोन बूथ’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. यात एक लाफ रायट (विनोदी आणि गंमतीदार) दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यापूर्वीही हॉरर कॉमेडी चित्रपट आले आहेत, परंतु यात एक वेगळीच गंम्मत आहे. या चित्रपटाची गोष्ट खूपच मनोरंजक असून सुरुवातीपासून ते शेवटपर्यत प्रेक्षकांना खेळवून ठेवणारी आहे.
याशिवाय मी पहिल्यांदाच विनोदी भूमिका साकारत आहे. यामुळे या भूमिकेसाठी मी उत्साहित आहे. कारण मला पहिल्यांदाच काहीतरी नवीन करण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान, “फोन बूथ’मध्ये कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर मुख्य भूमिका साकारत आहेत.





