Operation Tiger : उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसणार? ‘त्या’ दिवशी ‘ऑपरेशन टायगर’ फत्ते होणार; कोणते खासदार साथ सोडणार?
Operation Tiger : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ज्या 'ऑपरेशन टायगर' ची जोरदार चर्चा सुरू आहे,

Operation Tiger : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री तथा शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांनी मोठा दावा केला आहे. “ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात पोहोचले असून, एकनाथ शिंदे योग्य वेळ आणि मुहूर्त ठरवतील त्या दिवशी ते पूर्ण होईल,” असे जाधव यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटातील संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. (Operation Tiger)
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील सुनेगाव येथे एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना प्रतापराव जाधव यांनी हा दावा केला. ते म्हणाले, “या ऑपरेशनबाबत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही अप्रत्यक्षपणे कबुली दिली आहे. त्यामुळे आम्हाला यापुढे अधिक काही बोलण्याची गरज नाही.” (Operation Tiger)
दरम्यान, अंबादास दानवे यांनी यापूर्वी प्रतिक्रिया देताना, “काही लोक संपर्कात आहेत, काही उघडपणे बोलतात. आम्हाला सर्व माहिती आहे. लोकसभा निवडणुकीपासून संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता ते अधिकृतपणे मान्य करायला हवे,” असे विधान केले होते. याच वक्तव्याचा आधार घेत प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. (Operation Tiger)

Operation Tiger : उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसणार? ‘त्या’ दिवशी ‘ऑपरेशन टायगर’ फत्ते होणार; कोणते खासदार साथ सोडणार?
या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे. “ही महाराष्ट्रातील विकृती आहे. महाराष्ट्राला नासवण्याचे काम सुरू आहे. योग्य वेळी महाराष्ट्रातील जनता याला उत्तर देईल,” असे ते म्हणाले. तसेच, ‘ऑपरेशन टायगर’ची भाषा करणाऱ्यांवर टीका करत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. (Operation Tiger)
दरम्यान, या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (१४ जून) ‘मातोश्री’ येथे पक्षाच्या सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. आगामी राजकीय परिस्थिती आणि पक्षाची रणनीती यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Operation Tiger)





