Cockroach Janta Party : कॉकरोचला कमी लेखू नका.! उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, सरकारला दिला थेट इशारा
त्यांना कॉकरोच म्हणून हिणवणे व न्याय नाकारणे योग्य नाही. नीट पेपरफुटीने लाखो युवा वर्ग उद्ध्वस्त झाला आहे. असे सर्व पीडित तरुण-तरुणी कॉक्रोच बनून आक्रोश करीत आहेत.

Cockroach Janta Party – दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉकरोचचे आंदोलन सुरू झाले. ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते, भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले.
त्यांना कॉकरोच म्हणून हिणवणे व न्याय नाकारणे योग्य नाही. नीट पेपरफुटीने लाखो युवा वर्ग उद्ध्वस्त झाला आहे. असे सर्व पीडित तरुण-तरुणी कॉक्रोच बनून आक्रोश करीत आहेत.
सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल. कॉकरोचला कमी लेखू नका, हा इशारा जंतरमंतरवरील आंदोलनाने दिला आहे, असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
फेसबुकवरील एका पोस्टद्वारे शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी ठाकरे यांचा संदेश प्रसारित केला. यात म्हटले आहे की, तरुण हे देशाचे भविष्य आहेत आणि ते कडक उन्हात आंदोलन करत आहेत.
त्यांना न्याय नाकारणे आणि त्यांना कॉकरोच म्हणून संबोधणे अयोग्य आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे लाखो तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे आणि ते त्याविरोधात आंदोलन करत आहेत.
सरकारला तरुणांचा आवाज ऐकावाच लागेल आणि कॉकरोचला कमी लेखू नये. जंतरमंतरवरील आंदोलकांनी हाच संदेश दिला आहे, असे ठाकरे म्हणाले.
आंदोलनाला पूर्ण पाठिंबा – रोहित पवार
नीट आणि सीबीएसई परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्ध कॉकरोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी शनिवारी पाठिंबा दर्शविला.
रोहित पवार म्हणाले, या आंदोलनाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध आणि महत्त्वाच्या परीक्षांच्या कथित गैरव्यवस्थापनाबाबत देशातील तरुणांमध्ये वाढती नाराजी दर्शवतो. आंदोलनातील तरुणांचा अभूतपूर्व सहभाग त्यांच्यातील धुमसत असलेली असंतोषची भावना अधोरेखित करतो.
परीक्षांमधील अनियमितता तसेच केंद्र सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणांचा तरुण पिढीवर थेट परिणाम झाला असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण झाला आहे. विद्यार्थी आणि तरुणांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या या चळवळीला आपला पूर्ण पाठिंबा आहे, असे ते म्हणाले.






