Uddhav Thackeray : मोठी घडामोड ! उद्धव ठाकरे अलर्टमोडवर; मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची (Uddhav Thackeray) शक्यता वर्तवली जात असून 'ऑपरेशन टायगर २' ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची (Uddhav Thackeray) शक्यता वर्तवली जात असून ‘ऑपरेशन टायगर २’ ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाच्या ९ पैकी ६ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता ठाकरे गटाचे तब्बल १४ आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे.
एका बाजूला पक्षातील संभाव्य फुटीचे सावट असतानाच, दुसऱ्या बाजूला पनवेलमधील खारघर येथे मतदारांशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दुहेरी संकटामुळे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहेत.
खारघर सेक्टर १९ मधील एका झेरॉक्सच्या दुकानात बीएलओचे कोरे एसआरए (एसआयआर) फॉर्म्स सापडल्याने (Uddhav Thackeray) खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाच्या पनवेल महापालिकेतील गटनेत्या लीना गरड यांनी यावर गंभीर आरोप करत म्हटले की, विरोधकांची मते कमी करण्यासाठी आणि बोगस मतदार वाढवण्यासाठीच हा संपूर्ण गैरप्रकार सुरू असून ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.
या सर्व घडामोडींनंतर उद्धव ठाकरेंनी तातडीने ‘मातोश्री’वर पनवेलमधील प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक बोलावली. पक्षातील संभाव्य गळती आणि संशयास्पद घडामोडी रोखण्यासाठी ठाकरेंनी सर्व आमदारांना अत्यंत सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
“कोणत्याही एजंटचा किंवा संशयास्पद व्यक्तीचा फोन आल्यास तो त्वरित रेकॉर्ड करा,” असा थेट आणि गुप्त आदेशच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपल्या आमदारांना दिला आहे.
या संदर्भात माहिती देताना ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी स्पष्ट केले की, शिंदे गटात गेलेले काही पदाधिकारी आणि एजंट्सकडून सातत्याने संपर्क साधण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, आमदारांमध्ये कोणतीही फूट पडणार नसून पक्षाचे वातावरण बिघडवण्यासाठी या केवळ अफवा पसरवल्या जात आहेत. “जिना यहाँ, मरना यहाँ” अशी ठाम भूमिका मांडत आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सावंत यांनी ठणकावून सांगितले.






