Operation Tiger: शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’चे गोपनीय फोटो अखेर समोर! ओम बिर्लांच्या निवासस्थानी श्रीकांत शिंदेंसह ‘त्या’ मंत्र्याची उपस्थिती
Operation Tiger : ठाकरेंच्या सहा खासदारांनी थेट 22 जूनला मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला

Operation Tiger : शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’चे गोपनीय फोटो अखेर समोर आले आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार १७ जूनच्या पहाटे थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दिल्लीतील अधिकृत निवासस्थानी होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या थेट उपस्थितीत हा संपूर्ण राजकीय घटनाक्रम घडला.
९ पैकी सहा खासदार फुटले नसते तर इतर खासदारांना पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरवले गेले असते. सुरुवातीला ओमराजे निंबाळकरांची भूमिका देखील तळ्यातमळ्यात होती. त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी होणार की नाही याची चर्चा सुरू होती. (Operation Tiger)
त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपण शिंदेंसोबत असल्याचे स्पष्ट केले. आणि अखेर ठाकरेंच्या सहा खासदारांनी थेट 22 जूनला मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. (Operation Tiger)
निधी मिळत नाही, विकासकामे रखडली, उद्धव ठाकरे भेटत नाही असे आरोप करत खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली होती. यावरून त्यांच्यावर सातत्याने टीका देखील करण्यात आली. मात्र आता समोर आलेल्या या फोटोने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. (Operation Tiger)
हेही वाचा:







