Varvand : दौंड तालुक्यात ओंकार ग्रुपचा ऊसदरात डंका
Varvand : यासंदर्भात ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे-पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. ऊस दराच्या बाबतीत ओंकार ग्रुप कधीही मागे राहिलेला नाही. भविष्यातही राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला देणे ही आमची नैतिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

वरवंड : यवत येथील ओंकार रिन्यूएबल शुगर्स अँड बायोफ्युएल्स प्रा. लि. (युनिट क्रमांक १२) या कारखान्याने गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. (दि.१५) नोव्हेंबरपर्यंत गाळपासाठी आलेल्या उसापोटी प्रतिटन ३,६०० रुपये याप्रमाणे पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. दौंड तालुक्यात सर्वाधिक पहिली उचल देत ओंकार ग्रुपने ऊसदराच्या स्पर्धेत आघाडी घेतली आहे.
ओंकार ग्रुपने स्थापनेपासूनच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांच्या घामाला आणि कष्टाला योग्य मोबदला मिळावा, त्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम व्हावी, या उद्देशाने ग्रुप सातत्याने प्रयत्नशील आहे. कारखान्याने केवळ ऊसदर जाहीर न करता वेळेत ऊसबिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
यासंदर्भात ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे-पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. ऊस दराच्या बाबतीत ओंकार ग्रुप कधीही मागे राहिलेला नाही. भविष्यातही राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला देणे ही आमची नैतिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
३,६०० रुपयांची पहिली उचल वेळेत जमा करून आगामी काळात ३ हजार ८०० रुपये दर देण्याचे आश्वासन दिल्याने दौंड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष ओंकार ग्रुपकडे वेधले गेले आहे.
शेतकरी हिताचा विचार- थोरात
कारखान्याचे जनरल मॅनेजर राजेश थोरात यांनी सांगितले की, अध्यक्ष बाबुराव बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हिताचा विचार करून ऊसदर जाहीर करण्यात आला आहे. जाहीर केलेल्या दराप्रमाणे वेळेत ऊसबिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. आगामी गाळप हंगामात येणाऱ्या उसाला प्रतिटन ३ हजार ८०० रुपये दर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस ओंकार कारखान्याला गाळपासाठी पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कष्टाला योग्य मोबदला ही आमची नैतिकता
ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे-पाटील म्हणाले, ओंकार ग्रुप ऊसदराच्या बाबतीत कधीही मागे राहिलेला नाही आणि भविष्यातही राहणार नाही. मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी, त्यांच्या घामाचे मोल आणि शेतीतील आर्थिक अडचणींची मला जाणीव आहे. शेतकऱ्यांचा स्वाभिमान जपणे, त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला देणे आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीला हातभार लावणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. कारखान्याच्या प्रगतीत शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे भविष्यातही शेतकरी हितालाच सर्वोच्च प्राधान्य राहील. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस ओंकार ग्रुपला पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले.





