Pune District : राजगुरूनगरतील बंधार्यात एकाचा बुडून मृत्यू
Updated On:

राजगुरूनगर : राजगुरुनगर जवळील केदारेश्वर मंदिराजवळ भीमानदीवरील बंधार्याच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बु्डून मूत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.9) दुपारी घडली. गणेश शिवाजी कोरडे (वय 24 मूळ रा. चांदोरी, ता. निफाड, जि. नाशिक ) असे मूत्यू झालेल्या युवकाचे नांव आहे.
चांडोली येथील हॉटेल आमंत्रण मध्ये गणेश शिवाजी कोरडे हा वेटर म्हणून पाच महिन्यांपासून कामाला होता. सोमवारी दुपारी तो अजय दांडगे या दुसर्या वेटरबरोबर केदारेश्वर मंदिरा जवळ बंधार्यावर अंघोळ करण्यासाठी गेले होते. गणेशला पोहता येत नसल्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.





