‘वन नेशन-वन इलेक्शन’ देशाच्या हिताची….’; अजित पवार स्पष्टच बोलले

मुंबई – भारतात एक देश एक निवडणुक शक्य आहे. मोदी सरकार द्वारे संसदेचं विशेष अधिवेश बोलावले गेले याला घेऊन अनेक प्रकारचे अंदाज लावल्या जात आहे. या विशेष अधिवेशनात एक देश एक निवडणुक बिल जाहीर करण्यात येणार आहे. मोदी स्वःत या बिलाचे समर्थन करत आहे.
लोकसभेच्या निवडणूका लवकरच होणार आहे. त्या आधीच मोदी सरकार हे बिल आणण्याच्या प्रयत्न का करत आहे. देशासाठी हे का आवश्यक आहे, यावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर चर्चा केली आहे. तर, देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाला आता विरोधी पक्षातील नेत्यांनी विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाकडून देखील याला कडाडून विरोध होताना दिसत आहे. मात्र, विरोध करता करता भाजपसोबत राज्य सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही ‘वन नेशन वन इलेक्शनवर’ आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. यावेळी अजित पवार माध्यमांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, “एक देश, एक निवडणूक अशी चर्चा देशभरात सुरु आहे. एक देश एक निवडणुकीची देशाला नितांत गरज आहे. यामुळे खर्च कमी होतो. निवडणुकांमुळे आचारसंहिता लागल्याने बरेच प्रश्न निर्माण होतात. प्रशासकीय कामे करता येत नाही, अधिकाऱ्यांना आदेश देता येत नाही. देशात कुठे ना कुठे निवडणुका असतात.
दरम्यान आचारसंहितेमुळे 4-5 महिने काम ठप्प राहते. आणि अशी कामे ठप्प राहणे, या काळात परवडणार नाही. मोदींनी वेळोवेळी मांडलेल्या आणि केंद्र सरकारने आता पुढाकार घेतलेल्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेकडे सर्वांनी सकारात्मकपणे पहावे, देशात एकच निवडणूक झाली, तर हिताचे ठरेल. आणि देशाला याची नितांत गरज आहे, असे माझेही स्पष्ट मत आहे. असं मत अजित पवारांनी यावेळी व्यक्त केलं.





