MCOCA Case: निलेश घायवळ टोळीतील एकाला मोक्कामध्ये जामीन
MCOCA Case: ऑक्टोबर २०२५ मध्ये हा गुन्हा दाखल

पुणे – टोळीतील आरोपीवरील केस मागे घ्यावी व ५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केलेल्या गणेश बबन धनवे याला विशेष न्यायाधीश एच. एम. भोसले यांनी जामीन मंजुर केला आहे. त्याने ॲड.अजित पवार व ॲड. प्रणित नामदे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांना ॲड. वेदांत म्हैसकर, ॲड. अक्षय नामदे आणि ॲड. अपर्णा चौधरी यांनी सहकार्य केले.
ऑक्टोबर २०२५ मध्ये हा गुन्हा दाखल आहे. यामध्ये निलेश घायवळ टोळी विरोधात मोक्कानुसार कारवाई करण्यात आली. फिर्याद नोंदविण्यास झालेला अडीच महिन्यांचा विलंब, प्रथम माहिती अहवाल आणि न्यायदंडाधिकाऱ्यांसमोरील जबाबातील घटनास्थळाबाबतची विसंगती, संघटित गुन्हेगारीसंदर्भातील पुराव्यांचा अभाव आहे.
कथित घटना गणपती विसर्जनाच्या दिवशी घडल्याचे म्हटले आहे. मात्र, त्या दिवशी रस्त्यावरील गर्दी व पोलीस बंदोबस्त पाहता फिर्यादीला निर्जनस्थळी नेल्याच्या कथनाबाबत प्रश्न उपस्थित होतो. गुन्ह्यातून आर्थिक लाभ मिळवल्याचा पुरावा नाही. पूर्वी मोक्काचा गुन्हा असणे ही बाब जामीन नाकारण्यासाठी पुरेशी नसल्याचा युक्तीद बचाव पक्षाने केला.





