विशाल गणेश देवस्थानतर्फे एक लाखाचा मदतनिधी

नगर – नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्टतर्फे करोनाच्या प्रतिबंधक उपायोजनांसाठी एक लाख रुपायांचा निधी आज देण्यात आला. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. अभय आगरकर यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 50 हजार रुपये हजार, पंतप्रधान सहायता निधीसाठी 25 हजार रुपये, नगरमधील जनकल्याण समिती यांना समाजातील गरजू लोकांना धान्य वाटपासाठी 25 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. पंडितराव खरपुडे, अशोक कानडे, रामकृष्ण राऊत, पांडुरंग नन्नवरे, विजय कोथींबीरे, बाबासाहेब सुडके, हरिश्चन्द्र गिरमे, भाऊसाहेब फुलसौदर, चंद्रकांत फुलारी, बापूसाहेब एकाडे, ज्ञानेश्वर रासकर, गजानन ससाणे, रंगनाथ फुलसौदर, शिवाजी शिंदे, प्रकाश बोरुडे उपस्थित होते.
हनुमान जयंतीदिनी मंदिर परिसर ओस..!
हनुमान जयंती निमित्त माळीवाडा पंचमंडळ ट्रस्टतर्फे शनी मारुती मंदिर येथे आज देवस्थानचे पुजारी संगमनाथ महाराज यांच्या हस्ते महापूजा करून आरती वाजता करण्यात आली. जयंतीदिनी येथे गजबजणारी मंदिरे करोनाच्या पार्श्वभूमीवर आज अगदीच शांत व सुन्न होती





