जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत साकत येथे 19 वर्षीय तरुणाचा खून

जामखेड (प्रतिनिधी) – जमिनीच्या वादातून तालुक्यातील साकत येथे दोन गटात लाकडी दाडके व दगडाने झालेल्या तुंबळ हाणामारीत एक जणाचा मुत्यू झाला आहे. दोन्ही गटाकडील एकुण चार जण जखमी झाले असून परस्परविरोधी विरोधी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरुन यातील एकुण अकरा जणांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे.
या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला अमोल अशोक वराट वय २२ (साकत) यांनी पहीली फीर्याद दिली आहे. त्यांनी आपल्या फीर्यादीत म्हंटले आहे की फिर्यादीचे वडील अशोक वराट हे आरोपींना म्हणाले की आपली जमीन मोजून घेऊ म्हणजे आपले वाद मिटतील असे म्हणाल्याचा राग आरोपींना आला व १६ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास साकत गावातील फिर्यादीच्या घरासमोर गैरकायद्याची मंडळी जमा करून लाकडी दाडके, दगड, काठ्याने फिर्यादी व त्याच्या वडीलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपी अजय वराट व विजय वराट यांनी ओमकार वराट याच्या डोक्यात लाकडी दांडकयाने मारल्याने तो बेशुद्ध पडला. फिर्यादीने नातेवाईकांच्या मदतीने ओमला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. मात्र दि २३ मे रोजी सकाळी ७.४५ वा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयताचा भाऊ अमोल अशोक वराट यांच्या फिर्यादीवरून आरोपी किरण नागनाथ वराट, अजय किरण वराट, विजय किरण वराट, सुदाम किरण वराट, उध्दव नागनाथ वराट, विनोद उद्धव वराट, बाळु उद्धव वराट, सर्व रा साकत ता. जामखेड अशा एकुण सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील हे करत आहेत.
परस्परविरोधी दुसर्या फीर्यादीत अजय किरण वराट वय १७ रा. साकत याने म्हटले आहे की, मी शेतात जनावरांना पाणी पाजण्यासाठी जात आसताना आरोपीने फिर्यादीची मोटारसायकल अडवून म्हणाला तु मोटार चालू करण्यासाठी टाकलेली वायर का तोडली तेव्हा फिर्यादी म्हणाला की ती वायर आमच्या शेतात होती म्हणून तोडली तेव्हा आरोपी बाजीराव वराट यांने खाली पडलेला दगड जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारून गंभीर जखम केली व इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली यानुसार अशोक कुंडलीक वराट, बाजीराव अशोक वराट, अमोल अशोक वराट व ओमकार अशोक वराट ( मयत ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण करत आहेत.
या प्रकरणी खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपी किरण नागनाथ वराट, उद्धव नागनाथ वराट, विनोद उध्दव वराट, बाळू उर्फ गणेश वराट यांना अटक करण्यात आली आसून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर तर खुनाचा प्रयत्न करण्यात आलेल्या दुसर्या गुन्ह्यातील आरोपी आशोक कुंडलिक वराट, अमोल आशोक वराट, बाजीराव आशोक वराट यांना आज सकाळी आटक केली असून त्यांना देखील जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.





