Rahuri Election 2026 : राहुरीत शरद पवारांचा ‘मास्टरस्ट्रोक’! प्राजक्त तनपुरेंनी माघार घेताच ‘या’ शिलेदाराला दिली उमेदवारी
Rahuri Election 2026 : राहुरी पोटनिवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने गोविंदराव मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे.

Rahuri Election 2026 : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठी राजकीय घडामोड घडली असून निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. Rahuri Election 2026
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून अखेर स्थानिक नेते गोविंदराव मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, अर्ज भरण्याच्या अखेरच्या अर्ध्या तासात राजकीय समीकरणे बदलली आणि मोकाटे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. (Rahuri Election 2026)
महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. त्यामुळे आता राहुरीत थेट लढत रंगणार आहे. Rahuri Election 2026

Rahuri Election 2026 : राहुरीत शरद पवारांचा ‘मास्टरस्ट्रोक’! प्राजक्त तनपुरेंनी माघार घेताच ‘या’ शिलेदाराला दिली उमेदवारी
दरम्यान, भाजपकडून अक्षय कर्डीले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते दिवंगत नेते शिवाजीराव कर्डीले यांचे चिरंजीव आहेत. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.(Rahuri Election 2026)
अर्ज भरल्यानंतर बोलताना अक्षय कर्डीले यांनी वडिलांच्या अनुपस्थितीची खंत व्यक्त केली. “माझ्या राजकीय प्रवासाच्या सुरुवातीलाच साहेब माझ्यासोबत नाहीत, हे दुर्दैव आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून जोडलेल्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला मी एकटे सोडणार नाही,” असे त्यांनी सांगितले.
या सर्व घडामोडींमुळे राहुरी पोटनिवडणुकीत आता भाजपचे अक्षय कर्डीले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंदराव मोकाटे यांच्यात थेट सामना रंगणार आहे. (Rahuri Election 2026)





