पुणे | एक लाख ७८ हजार विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांचा लाभ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दहावीच्या परीक्षेत राज्यातील १ लाख ७८ हजार ८६५ विद्यार्थ्यांना विविध कला, क्रीडा क्षेत्रांत प्रावीण्य मिळविल्याबद्दल सवलतीच्या गुणांना लाभ मिळाला आहे. यामध्ये सर्वाधिक १ लाख २८ हजार १९८ विद्यार्थ्यांना चित्रकलेबद्दल सवलतीचे गुण मिळाले आहेत.
सवलतीच्या गुणांचा लाभ घेण्यात पुणे विभाग अव्वल ठरला आहे. या विभागातील ४० हजार २८३ विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे, तर सर्वांत कमी नागपूर विभागातील ५ हजार ९७९ विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. राज्यात शास्त्रीय नृत्यात प्रावीण्य मिळविल्याने १ हजार ५८९ विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण प्राप्त झाले आहेत.
शास्त्रीय गायनामुळे २ हजार ९४०, शास्त्रीय वाद्यातील प्रावीण्यामुळे १ हजार १५१, लोककलेसाठी ११ ह्जार ३१८, नाटकासाठी ७ विद्यार्थी याप्रमाणे विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळाले आहेत. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल ३२ हजार ९६३, एनसीसीसाठी २४, स्काउट गाईडबद्दल ६७४ विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे.
विभागनिहाय सवलतीचे गुण मिळविलेले विद्यार्थी
पुणे – ४०२८३
नागपूर- ५९७९
छत्रपती संभाजीनगर – १६७८०
मुंबई – ३१४३६
कोल्हापूर – २९८०३
अमरावती – १२९१५
नाशिक – २२१९१
लातूर -१२०९४
कोकण – ७३८३





