Pune District | बिडी पिणे जीवावर बेतले लुंगी पेटल्याने एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

शिरूर : शिरूर शहरातील डंबेनाला येथील छोटूभाई फकीर मोहम्मद शेख (वय ८५) यांना बीडी पीने चांगलेच महागात पडले. त्यांचा बिडी पिताना बिडी लुंगीवर पडून कपड्यांना आग लागून होरपळून त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना पॅरालिसिसचा आजार असून ते घरामध्येच असतात. त्यांना बीडी पिण्याचे व्यसन होते. ही बिडीच त्यांच्या जीवावर बेतली आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे त्यांचा मुलगा हमीद छोटू शेख यांनी खबर दिली आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि.४) रोजी दुपारी छोटूभाई बिडी पित होते. यावेळी त्यांच्या लुंगीला आग लागली. यावेळी घरातील नातेवाईकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, ते भाजल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राऊत हे करीत आहे.





