पिंपरी | लैंगिक अत्याचार प्रकरणी एकास अटक

पिंपरी, (प्रतिनिधी) – लग्नाचे अमिष दाखवून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना ओटास्कीम निगडी येथे घडली.
जुनेद रहिम खान (वय ३५, रा. कोंढवा, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ओटास्कीम, निगडी येथे राहणार्या एका २४ वर्षीय तरुणीने याबाबत बुधवारी (दि. २६) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १३ नोव्हेंबर २०२२ रोजी घडली.
फिर्यादी एकट्या घरी असताना आरोपीने पाण्यात गुंगीचे औषध मिसळून दिले. ये पाणी तुझे मंत्र बोलकर दिया है. इसे तेरे पे जो गंदी साया है वो निकल जायेगी. फिर्यादी हिने पाणी प्यायल्यावर त्या बेशुद्ध झाल्या. त्यानंतर आरोपी जुनेद याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच २० जानेवारी २०२३ रोजी औरंगाबाद येथे लग्न करतो, असे आमिष दाखवून आरोपीने अत्याचार केले.
यातून पिडित तरुणी या गरोदर राहिल्याचे सांगितल्यावर आरोपीने तिला व तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत तिचा गर्भपात केला. तिने वारंवार लग्नासाठी विचारण केली असता तिला शिवीगाळ करीत मारहाण केली.




