दहशतवादी हल्ला युद्ध समजला जाईल; भारत सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावादरम्यान भारत सरकारने शनिवारी (१० मे) मोठा निर्णय घेतला. भविष्यात कोणताही दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध युद्ध समजला जाईल आणि त्याला त्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाईल, असे सरकारने स्पष्ट केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हवाई घुसखोरी आणि आतंकी कारवायांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, लष्करप्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर विदेश मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली.
India has decided that any future act of terror will be considered an Act of War against India and will be responded accordingly: Top GoI sources pic.twitter.com/zZSAXzu3o6
— ANI (@ANI) May 10, 2025
विदेश सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या हालचाली उकसवणाऱ्या आणि आक्रमक आहेत. कर्नल सोफिया कुरैशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पाकिस्तानने २६ ठिकाणी हवाई घुसखोरीचा प्रयत्न केला. याशिवाय, श्रीनगर, अवंतीपोरा आणि उधमपुर येथील वैद्यकीय सुविधा आणि पंजाबमधील हवाई तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
#WATCH | Himachal Pradesh: Hollowed ground in Damtal village of Kangra district, located near Pathankot in Punjab, where debris of a projectile has been found.
Police say, “A while ago, a blast was heard here. Following that, we reached here. We have secured the area. Experts… pic.twitter.com/MaOqnHIuuZ
— ANI (@ANI) May 10, 2025
पाकिस्तानचा नागरी सुविधांवर हल्ला:
कुरैशी यांनी सांगितले की, पाकिस्तानने नागरी विमानांच्या आडून हवाई मार्गांचा गैरवापर केला. श्रीनगर, कुपवाडा, बारामुला, पुंछ आणि राजौरी येथे शाळा आणि वैद्यकीय केंद्रांना लक्ष्य करत हलक्या शस्त्रांनी गोळीबार केला. जम्मूच्या आरएस पुरा येथे पाकिस्तानी गोळीबारात अशोक कुमार यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे कुटुंबीय जखमी झाले. रात्रीच्या हल्ल्यांत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला, यात एक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि राजौरीतील दोन बिहारी नागरिकांचा समावेश आहे.
#WATCH | Delhi: Colonel Sofiya Qureshi says, “After Pakistan deliberately targeted air bases, Indian armed forces took a quick and well-planned retaliatory action and targeted technical installations, command & control centres, radar sites and arms store. Pakistan military bases… pic.twitter.com/BoWL3AzOe5
— ANI (@ANI) May 10, 2025
भारताचे प्रत्युत्तर:
भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना यशस्वीपणे तोंड दिले. गुजरातच्या कच्छ येथे एल-७० हवाई संरक्षण तोफेने पाकिस्तानी ड्रोन पाडले. बीएसएफने जम्मूच्या अखनूरसमोरील सियालकोट येथील आतंकी तळ उद्ध्वस्त केले. श्रीनगर येथे जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.
Indian army thwarts Pakistani drone attack along western border
Read @ANI Story | https://t.co/VVE8X2w5C6#IndianArmy #Pakistan #drone pic.twitter.com/O5ZrB4gFiv
— ANI Digital (@ani_digital) May 10, 2025
स्थानिक परिस्थिती:
गुजरातच्या भुजमध्ये दुकाने बंद राहिली, तर स्थलांतरित मजूर बिहार आणि यूपीला रवाना झाले. हरियाणाच्या सिरसा आणि पंजाबच्या गुरदासपूर येथे क्षेपणास्त्रांचे अवशेष सापडले. श्रीनगरच्या लासजान येथे विस्फोटानंतर मलबा घरांवर पडला, तरी कोणी जखमी झाले नाही. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी खोट्या बातम्यांसह ५,००० सोशल मीडिया पोस्ट हटवल्या.
दरम्यान, सरकारने माध्यमांना नागरी संरक्षण सायरनचा वापर न करण्याचे निर्देश दिले आहेत.





