“जिवंतपणी मिळत असलेल्या मरणयातना एकदा इव्हेंटबाज सरकारने…”; गडचिरोलीतील ‘त्या’ घटनेवरून विजय वडेट्टीवारांची टीका

Vijay Wadettiwar | महाराष्ट्र विकासाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जात असताना गडचिरोलीतील काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथे आजोळी गेलेल्या दोन्ही लहान मुलांना अचानक ताप आल्याने आई-वडिलांनी त्यांना दवाखान्याऐवजी पुजाऱ्याकडे नेले. मात्र दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली आणि दोघांनीही आपला जीव गमवावा लागला.
परंतु या भागात रस्त्यांची स्थिती बिकट आहे. शववाहिका पोचत नसल्याने पालक दोन्ही मृतदेह खांद्यावर टाकून 15 किमीपर्यंत चालत त्यांच्या गावाला पोहोचले आहे. गडचिरोलीतील अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचे वेदनादायी वास्तव मांडणारी ही घटना बुधवारी घडली. यावरुन आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
विजय वडेट्टीवार यांचे ट्वीट
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स हँडलवरून विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीमधील या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. “गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आले. गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे. ”
“दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे. आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला.” Vijay Wadettiwar |
दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे.
आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास… pic.twitter.com/ekQBQHXeGu
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 5, 2024
पुढे त्यांनी म्हटले, “रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. आईवडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेतले. चिखलातून वाट शोधत १५ किलोमीटर दूर अंतरावरचे अहेरी तालुक्यातील पत्तीगाव पायीच गाठले. गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आले.” Vijay Wadettiwar |
“… इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊन बघावे”
यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यावरही हल्लाबोल केला. “गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा आहे. हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ. दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात. दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे,” असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. Vijay Wadettiwar |
हेही वाचा:
इस्रायल दूतावासाबाहेर गोळीबार ; अज्ञाताकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न ; पहा व्हिडिओ





