इस्रायल दूतावासाबाहेर गोळीबार ; अज्ञाताकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न ; पहा व्हिडिओ

Firing outside Israel Embassy । म्युनिकमधील इस्रायली दूतावासाबाहेर एका शूटरने अनेक वेळा गोळीबार केला. यादरम्यान एकच गोंधळ उडाला. याचा एक व्हिडिओही जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती पळताना दाखवली आहे, तर अनेक गोळ्यांचे आवाज ऐकू येतात. या घटनेनंतर डझनभर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत.
एका संशयिताला अटक Firing outside Israel Embassy ।
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिका-यांनी एका संशयितावर गोळ्या झाडल्या, तो जखमी झाला आणि सध्या परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. म्युनिक पोलि सांनी ट्विटरवर लिहिले की, सध्या ब्रिएनरस्ट्रास आणि कॅरोलिनप्लॅट्झ परिसरात मोठी कारवाई सुरू आहे. आमच्याकडे अनेक आपत्कालीन कर्मचारी आहेत. आम्ही तुम्हाला विनंती करतो की हे क्षेत्र शक्य तितके टाळावे. या कारवाईसाठी हेलिकॉप्टरमधूनही देखरेख केली जात आहे.
Schüsse vor dem israelischen Generalkonsulat in München. Das NS-Dokuzentrum ist direkt nebenan. pic.twitter.com/k1r819o9Rj
— Ronen Steinke (@RonenSteinke) September 5, 2024
म्युनिक येथील इस्रायली वाणिज्य दूतावासाजवळ गोळीबाराची घटना घडल्याची माहिती इस्रायली माध्यमांनी गुरुवारी दिली. बव्हेरियाची राजधानी म्युनिक येथील इस्रायली वाणिज्य दूतावासाजवळ वारंवार गोळीबाराचा मोठा आवाज आल्यानंतर मोठ्या संख्येने पोलीस दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
Shots fired outside Israeli 🇮🇱 consulate in Munich #München, Germany 🇩🇪 https://t.co/qetzHEz8AP pic.twitter.com/WQTqjif0m6
— Saad Abedine (@SaadAbedine) September 5, 2024
एकही कर्मचारी जखमी झाला नाही Firing outside Israel Embassy ।
परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाने सांगितले की, वाणिज्य दूतावासातील एकही कर्मचारी जखमी झाला नाही. परिस्थिती हाताळणाऱ्या सुरक्षा दलांनी हल्लेखोराला पकडले आहे. जेरुसलेम पोस्टनुसार, 52 वर्षांपूर्वी म्युनिकमध्ये असाच हल्ला झाला होता. इस्रायलच्या ऑलिम्पिक खेळाडूंची पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी हत्या केली होती. या घटनेच्या स्मरणार्थ गुरुवारी वाणिज्य दूतावास बंद ठेवण्यात आला होता. म्युनिक पोलिसांनी सांगितले की या कारवाईशी संबंधित इतर कोणत्याही संशयितांचे संकेत नाहीत.





