कर्नाटकातील ‘हिजाब’ प्रकरणावर राहुल गांधी म्हणाले,”…देवी सरस्वती सर्वांना ज्ञान देते. ती भेद करत नाही”

मुंबई – हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या सहा विद्यार्थिनींना कर्नाटकातील एका महाविद्यालयाने मंगळवारपासून प्रवेशबंदी केली. हिजाब घालूनच आम्ही महाविद्यालयात येऊ, अशी भूमिका या विद्यार्थिनींनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून घेतली आहे.
कर्नाटकमधील उडुपीप्रमाणेच कुंदापूर येथील एका महाविद्यालयात काही विद्यार्थिनींनी हिजाब घालूनच वर्गात येऊ अशी भूमिका घेतली. त्याला प्रत्युत्तर म्हणून १०० विद्यार्थ्यांनी भगवी शाल पांघरून महाविद्यालयात प्रवेश केला. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात तणाव निर्माण झाला आहे. कुंदापूरच्या स्थानिक नेत्यांनी हा वाद मिटविण्यासाठी घेतलेली बैठक निष्फळ ठरली आहे. यातच कर्नाटकात ‘हिजाब’वरून सुरू असलेल्या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत.
कुंदापूर येथील भांडारकर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच हिजाब घालून येणाऱ्या विद्यार्थीनींना रोखलं गेल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडियो सोशलवर व्हायरल होत असून आता काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काय आहे राहुल गांधी यांचे ट्विट
“विद्यार्थ्यीनींचे हिजाब त्यांच्या शिक्षणाच्या आड आणून आपण भारतातील मुलींचे भविष्य लुटत आहोत. देवी सरस्वती सर्वांना ज्ञान देते. ती भेद करत नाही.
By letting students’ hijab come in the way of their education, we are robbing the future of the daughters of India. Ma Saraswati gives knowledge to all. She doesn’t differentiate: Congress leader Rahul Gandhi
(File photo) pic.twitter.com/HwqLgbmSul
— ANI (@ANI) February 5, 2022
संबंधित बातमी





