पुणे | दि.२७ सप्टेंबरला पंतप्रधान पुणे दौऱ्यावर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – स्वारगेट ते सिव्हील कोर्ट या भूमिगत मेट्रो मार्गाच्या उद्घाटन आणि केंद्राकडून मान्यता मिळालेल्या स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचे भूमिपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दि. 27 सप्टेंबरला पंतप्रधान पुणे दौर्यावर येत असून, त्यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमीपूजन होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्यासंदर्भात मुख्य सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागीय आयुक्तांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत दौर्यातील कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विविध विभागाच्या अधिकार्यांची गुरुवारी (दि.12) विभागीय आयुक्तालयात प्राथमिक बैठक घेतली.
त्या बैठकीत मोदींच्या दौर्याच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. बैठकीची अंतिम फेरी सुद्धा होणार असून त्यानंतर कार्यक्रमाच्या नियोजनावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे.





