Pune District : नीरेत 30 डिसेंबर रोजी बळीराजाचा रास्ता रोकोे
Updated On:

वाल्हे : कृषिसंबंधित नवीन कायदे रद्द करावेत, हमीभाव मिळण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा आदी मागण्यासाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनास पुणे जिल्हा किसान सभेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
मांडकी (ता. पुरंदर) येथे आयोजित बैठकीत, शेतकर्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार्या केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.
दिल्लीतील शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सोमवारी ठीक-ठिकाणी रस्ता रोको आंदोलने करण्यात येणार आहेत; त्या पार्श्वभूमीवर पाठिंबा दर्शविण्यासाठी सोमवारी (दि.30) सकाळी 10 वाजता नीरा येथे रास्ता रोकोमध्ये जास्तीत जास्त शेतकर्यांना सहभागी होण्याचे आवाहन अॅड. फत्तेसिंग पवार यांनी केले आहे. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.





