हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. पुन्हा एकदा, म्हणजे सलग तिसऱ्यांदा हरियाणा राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्याचे दिसत आहे. यावेळी काँग्रेसला विजयाची आशा होती. मात्र यंदाही भाजपने आघाडीवर येत विजय मिळवला. आता या निकालांवरही प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस पक्षाचा निवडणूक निकालाबाबत अरविंद केजरीवाल यांनीही निशाणा साधला आहे. केजरीवाल म्हणाले की, निवडणुकीच्या निकालाचा सर्वात मोठा धडा म्हणजे निवडणुकीत कधीही अतिआत्मविश्वास ठेवू नये. यातूनच दिसून येतो’ नेमकं काय म्हणाले अरविंद केजरीवाल ? ‘निवडणुकीच्या निकालाचा सर्वात मोठा धडा म्हणजे निवडणुकीत कधीही अतिआत्मविश्वास ठेवू नये.’ दरम्यान केजरीवाल यांचे हे विधान अशावेळी आले आहे जेव्हा हरियाणातील 90 विधानसभा जागांवर भाजप स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. भाजप नेते अनिल विज यांनी हरियाणात सरकार स्थापनेबाबत काय केला दावा ? ‘आप’च्या महापालिका सदस्यांच्या गटाला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, ‘हरियाणामध्ये काय परिणाम सर्वांचा लक्षात येत आहे. त्याचा सर्वात मोठा धडा म्हणजे निवडणुकीत कधीही अतिआत्मविश्वास ठेवू नये. कोणतीही निवडणूक हलक्यात घेऊ नये. प्रत्येक निवडणूक आणि प्रत्येक जागा अवघड असते. दरम्यान, हरियाणा निवडणुकीत आप-काँग्रेसच्या युतीसाठी अनेक प्रयत्न करण्यात आले होते. मात्र युती होऊ शकली नाही. यानंतर राज्यातील एकूण 90 पैकी 89 जागांवर ‘आप’ने एकट्याने निवडणूक लढवली. जवळपास सर्वच जागांवर आपचे उमेदवार भाजप आणि काँग्रेसपेक्षा मागे आहे. निवडणूक प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी यापूर्वीच सांगितले होते की, ‘आप’च्या पाठिंब्याशिवाय राज्यात कोणतेही सरकार स्थापन होणार नाही. =============