Omar Abdullah Divorce : ओमर आणि पायल अब्दुल्ला यांच्या घटस्फोटास सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah Divorce) आणि त्यांची विभक्त पत्नी पायल अब्दुल्ला यांचा विवाह रद्द करण्यास (घटस्फोटास) शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली.

Omar Abdullah Divorce : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah Divorce) आणि त्यांची विभक्त पत्नी पायल अब्दुल्ला यांचा विवाह रद्द करण्यास (घटस्फोटास) शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली. दोन्ही पक्षांनी आपापसातील सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah Divorce) यांच्या वतीने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले की, दोन्ही पक्षांमध्ये तडजोड झाली असून राज्यघटनेच्या कलम १४२ अंतर्गत विवाह विच्छेदनासाठी (घटस्फोटासाठी) याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालय लवकरच यावर औपचारिक आदेश जारी करणार आहे.
सुनावणीदरम्यान वरिष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले, दोघांनीही सहमतीने विभक्त होण्याचा मार्ग निवडला आहे. सर्व वाद मिटले आहेत. कलम १४२ अंतर्गत अर्ज दाखल करण्यात आला असून न्यायालयाने घटस्फोट मंजूर करावा. यावर हे प्रकरण कधी दाखल केले गेले, अशी विचारणा खंडपीठाने केली असता, २२ जुलै रोजी हा अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच दोन्ही बाजूंचे इतर सर्व प्रलंबित खटले मागे घेतले जातील, असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले.
ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah Divorce) यांनी क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मागणाऱ्या दोन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. जुलै २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या ओमर अब्दुल्ला यांच्या याचिकेवर पायल अब्दुल्ला यांना नोटीस बजावली होती.
ऑगस्ट २०२३ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या एकेरी खंडपीठाने ओमर अब्दुल्ला यांना त्यांच्या विभक्त पत्नीला दरमहा १.५ लाख रुपये अंतरीम पोटगी देण्याचे निर्देश दिले होते. याशिवाय त्यांच्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी ६०,००० रुपये प्रति महिना देण्याचे आदेशही देण्यात आले होते.






