Cricket : “तोच रनअप, अगदी तशीच बॉलिंग ॲक्शन…” क्रिकेट जगताला मिळाला दुसरा Shoaib Akhtar? स्वत: अख्तरनं शेअर केला ‘तो’ व्हिडिओ…

Bowler Like Shoaib Akhtar : शोएब अख्तर हा सध्या क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान गोलंदाज आहे. अख्तरने 2003 मध्ये ताशी 161.3 किमी वेगाने चेंडू टाकला होता, जो क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू आहे. अख्तरच्या रेकॉर्डला 20 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण तो कोणीही मोडित काढू शकलेलं नाही.
अख्तर याच्यानंतर त्याच्यासारखा वेगवान गोलंदाज क्रिकेट जगतात आला नाही. पण आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक गोलंदाज हुबेहुब अख्तरप्रमाणे गोलंदाजी करत आहे.
Imran Mohammad or Shoaib Akhtar ?
— Zeeshan Qayyum ☄️ (@XeeshanQayyum) December 26, 2021
विशेष म्हणजे शोएब अख्तरने स्वतः या गोलंदाजाचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला होता. अख्तरप्रमाणे गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचे नाव इमरान मोहम्मद आहे. तो ओमानमध्ये क्रिकेट खेळत असला तरी इम्रान मूळचा पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा येथील आहे.
He’s more Shoaib Akhtar than Shoaib Akhtar himself… pic.twitter.com/cXKQGgNgbn
— Prashanth S (@ps_it_is) September 19, 2024
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये इमरान शोएब अख्तरप्रमाणेच रनअप घेत असल्याचे दिसून येते. याशिवाय त्याची ॲक्शनही हुबेहुब शोएब अख्तरसारखीच आहे. ही बाब केवळ रनअप आणि बॉलिंग ॲक्शन सारखे असण्यापुरतीच मर्यादित नाही, तर इम्रानचे दिसणेही अख्तरसारखे आहे.
ओमानमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे करतो काम….
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोएब अख्तर सारखी गोलंदाजी करणाऱ्या इम्रान मोहम्मदने वयाच्या 18 व्या वर्षी पाकिस्तान सोडला आणि आता तो ओमानची राजधानी मस्कत येथे राहतो, जिथे तो सीसीटीव्ही कॅमेरे लावून आपला उदरनिर्वाह करतो. याशिवाय तो क्रिकेटचा सरावही करत राहतो आणि ओमानमध्ये होणाऱ्या लीगमध्ये भाग घेत असतो. पण आता तो चांगलाच व्हायरल झाला आहे.





