Om Birla : तृणमूलच्या बंडखोर खासदारांना उत्तरासाठी सभापती ओम बिर्ला यांच्याकडून मुदतवाढ
तृणमूल कॉंग्रेसने २० बंडखोर खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर उत्तर देण्यासाठी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला (Om Birla) यांनी बंडखोर खासदारांना २२ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली.

Om Birla : तृणमूल कॉंग्रेसने २० बंडखोर खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर उत्तर देण्यासाठी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला (Om Birla) यांनी बंडखोर खासदारांना २२ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली.
अपात्रतेसाठीच्या याचिकांवर तातडीने निर्णय घ्यावा, असे साकडे तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी बिर्ला यांना घातले. मात्र, निर्णयास विलंब होत असल्याचे कारण देत अभिषेक यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी न्यायालयाने २५ ऑगस्टला दर्शवली. त्यानंतर पुढील दिवशी बिर्ला यांनी बंडखोर खासदारांना नोटिसा बजावून सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले.
बंडखोर खासदारांनी उत्तरासाठी मुदतवाढ मागितली. त्यांची विनंती मान्य करत बिर्ला यांनी गुरूवारी उत्तर दाखल करण्यास मुदतवाढ दिली. पश्चिम बंगालमध्ये काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये पराभूत झालेल्या तृणमूलमध्ये फूट पडली.
बंगालमधील लोकसभेच्या २० खासदारांनी तृणमूलची साथ सोडली. त्या बंडखोर खासदारांनी आपला गट फारशा ज्ञात नसलेल्या एनसीपीआय या पक्षात विलीन केला. त्यांना पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत अपात्र ठरवण्याची मागणी तृणमूलने लावून धरली आहे.






