CM News : मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीने गंभीर प्रकरण 5 कोटी रूपये घेऊन मिटवले? राजकीय वर्तुळात खळबळ

CM News : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि त्यांच्या पत्नीमार्फत बलात्कार प्रकरणे ५ कोटी रुपयांत मिटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा भाजपचा आरोप. गुरविंदर चहल प्रकरणामुळे राजकीय वाद वाढला.

Updated On:

CM News : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि त्यांच्या पत्नी गुरप्रीत कौर यांच्या माध्यमातून लैंगिक अत्याचार आणि गुन्हेगारी प्रकरणे कोट्यवधी रुपयांत मिटवली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत हा दावा केला. मात्र, त्यांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्री मान किंवा त्यांच्या पत्नीचे नाव थेट घेतलेले नाही.

भंडारी यांच्या दाव्यानुसार, मध्यस्थांच्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये तब्बल ५ कोटी रुपयांची मागणी करून प्रकरणे मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी काही ऑडिओ क्लिपही माध्यमांसमोर सादर केल्या. या क्लिपमध्ये कथित मध्यस्थ आपल्या राजकीय संपर्कांचा उल्लेख करत लैंगिक अत्याचार आणि इतर गुन्हेगारी प्रकरणे मिटवण्याबाबत बोलताना ऐकू येत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.  (CM News)

भाजपने या प्रकरणात मुख्यमंत्री मान यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. तसेच, या कथित व्यवहारांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा किंवा त्यांच्या पत्नीचा सहभाग आहे का, याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली.

गुरविंदर सिंग चहल प्रकरणामुळे वाद –  (CM News)

या आरोपांचा संबंध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर गुरविंदर सिंग चहल याच्यावरील लैंगिक अत्याचार आणि अपहरणाच्या प्रकरणाशी आहे. एप्रिलमध्ये पीडित महिलेच्या वडिलांनी चहलवर अपहरणाचा आरोप केला होता. त्यानंतर २९ एप्रिल रोजी अमृतसरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला.

१ मे रोजी महिला सापडल्यानंतर प्रकरणात लैंगिक अत्याचाराचे कलम जोडण्यात आले. त्यानंतर सुमारे दोन आठवड्यांनी चहलला अटक करण्यात आली. मात्र, जुलैमध्ये त्याची सुटका झाली. या प्रकरणाच्या तपासावर शिरोमणी अकाली दलाने प्रश्न उपस्थित करत पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने झाला नसल्याचा आरोप केला.

दरम्यान, पीडितेच्या वडिलांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पोलिसांवर प्रकरण दडपण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप केला. चहलनेही आपल्या सहकाऱ्यामार्फत न्यायालयात धाव घेतली होती. त्यात अमरदीप सिंग ग्रेवाल नावाची व्यक्ती प्रकरण मिटवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची मागणी करत असल्याचा दावा करण्यात आला. या व्यक्तीने मुख्यमंत्री यांच्या पत्नीशी जवळीक असल्याचे सांगितल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला.

उच्च न्यायालयाने २० जुलै रोजी याचिका निकाली काढत तपास विशेष पोलीस महासंचालकांकडे सोपवला.

राज्यपालांकडे सीबीआय चौकशीची मागणी –  (CM News)

या प्रकरणावरून पंजाबमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. शिरोमणी अकाली दलाने पंजाबच्या राज्यपालांची भेट घेत मुख्यमंत्री कार्यालयातील कथित भ्रष्टाचार आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपीला संरक्षण देण्याच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली.

दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या पत्नी गुरप्रीत कौर यांना नोटीस बजावली आहे. लैंगिक अत्याचाराच्या आरोपीला वाचवण्यासाठी ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याच्या आरोपांनंतर निवृत्त उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रणजीत सिंग यांच्या तक्रारीवरून NHRCने ही कारवाई केली.

भाजपने अमरदीप सिंग ग्रेवाल हा कथित मध्यस्थ असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री मान यांनी या प्रकरणातील आपली आणि पत्नीची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, मुख्यमंत्री भगवंत मान किंवा आम आदमी पक्षाने या गंभीर आरोपांवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

पुढील वर्षी पंजाब विधानसभा निवडणुका होणार असल्याने हे प्रकरण आता राज्यातील राजकारणात मोठा मुद्दा बनण्याची शक्यता आहे.

आणखी संबंधित बातम्या

Manoj Jarange : भाजप नक्की कोणाचा गेम करतंय, माझा की शिंदेंचा? मनोज जरांगेचा खळबळजनक गौप्यस्फोट

2026-10-20 18:01:43

Manoj Jarange : भाजप नक्की कोणाचा गेम करतंय, माझा की शिंदेंचा? मनोज जरांगेचा खळबळजनक गौप्यस्फोट

Ravindra Chavan : सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; रविंद्र चव्हाण यांची राहुल गांधींवर टीका

2026-10-20 16:48:26

Ravindra Chavan : सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; रविंद्र चव्हाण यांची राहुल गांधींवर टीका

Satej Patil : अन् वारं फिरलं! गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटलांनी कसा पलटवला डाव? 'हे' मुद्दे ठरले गेमचेंजर

2026-10-20 10:59:35

Satej Patil : अन् वारं फिरलं! गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटलांनी कसा पलटवला डाव? 'हे' मुद्दे ठरले गेमचेंजर

Saamana Editorial : 'रामराज्य’ संपवून ‘रावणराज्य’ सुरू.... ; दसरा मेळाव्याअगोदरच ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल; "विचारांचे सोने लुटायचे आणि..."

2026-10-20 09:21:16

Saamana Editorial : 'रामराज्य’ संपवून ‘रावणराज्य’ सुरू.... ; दसरा मेळाव्याअगोदरच ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल; "विचारांचे सोने लुटायचे आणि..."

Rajnath Singh : एससीओ बैठकीसाठी राजनाथ सिंह ताजिकीस्तानला रवाना

2026-10-19 21:28:57

Rajnath Singh : एससीओ बैठकीसाठी राजनाथ सिंह ताजिकीस्तानला रवाना
CM News : मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीने गंभीर प्रकरण 5 कोटी रूपये घेऊन मिटवले? राजकीय वर्तुळात खळबळ - Dainik Prabhat