सर्वात जुनी याचिका 72 वर्षांनी निकाली, काय होती याचिका?

कोलकता – कोलकाता उच्च न्यायालयात देशातील सर्वात जुनी याचिका 72 वर्षांनंतर निकाली निघाली आहे. विशेष म्हणजे, ज्या न्यायमूर्तींनी या याचिकेवर निर्णय दिला ते उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांचा जन्म 1951 मध्ये झाला, हा खटला दाखल झाल्यानंतर एक दशक पूर्ण झाले होते. पूर्वीच्या बेहरामपूर बॅंक लिमिटेडची कार्यवाही संपुष्टात आणण्यासंबंधीचा खटला या निकालामुळे अखेर संपुष्टात आला आहे.
पश्चिम बंगालमधील बेहरामपूर बॅंक बंद करण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका 1 जानेवारी 1951 रोजी दाखल करण्यात आली आणि त्याच दिवशी ‘केस क्रमांक 71/1951’ म्हणून नोंदवण्यात आली. कर्जदारांकडून पैसे वसूल करण्यासाठी बॅंकेवर अनेक खटले होते. यापैकी अनेक कर्जदारांनी बॅंकेच्या दाव्याला आव्हान देत न्यायालयात धाव घेतली होती.
मात्र, देशातील पुढील पाच सर्वात जुन्या प्रलंबित प्रकरणांपैकी दोन प्रकरणे निकाली काढणे बाकी आहे. ही सर्व प्रकरणे 1952 मध्ये दाखल झाली आहेत. राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रीडमध्ये बेहरामपूर प्रकरणाचा उल्लेख 9 जानेवारीपर्यंत कोणत्याही भारतीय न्यायालयात सुनावणी झालेला सर्वात जुना खटला म्हणून करण्यात आला आहे.
देशातील तीन सर्वात जुन्या खटल्यांपैकी, मालदा, बंगालच्या दिवाणी न्यायालयात दोन दिवाणी खटले सुरू आहेत आणि एक मद्रास उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रदीर्घ काळ चाललेल्या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी मालदा न्यायालयांनी या वर्षी मार्च आणि नोव्हेंबरमध्ये सुनावणीच्या तारखा निश्चित केल्या आहेत.




