वॉशिंग्टन : अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना प्रांतात माणसासारखे दात असणारा एक दुर्मिळ मासा सापडला आहे. शिप्स हेड फिश नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्या माणसाच्या तोंडामध्ये फक्त दात आणि दातच आहेत हे मासे सर्वसाधारणपणे अटलांटिक महासागरात सापडतात.
फील डिपार्टमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शिप्स हेड जातीच्या माशांमधील दात अतिशय वेगळे असतात. याच्या तोंडामध्ये 3 फूट लांबीचे दात असू शकतात. करड्या रंगाच्या या माशाच्या शरीरावर काळे पट्टे असतात. या माशाचे स्वरुप भयानक असल्यामुळे त्याला क्रीपी लुकिंग फिश असेही म्हणतात.
नॉर्थ करोलीना प्रांतातील साउथ मिल्स येथे राहणाऱ्या नाथन मार्टिन या नागरिकाने हा मासा पकडला आहे. अकॅडमी ऑफ सायन्स कलेक्शनचे मॅनेजर डेव्हिड कॅटेटनिया यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जोपर्यंत माणूस या माणसाला त्रास देत नाही तोपर्यंत या माशाचा कोणताही त्रास माणसाला होणार नाही, या माशाचे फोटो सोशल माध्यमातून प्रसिध्द होताच त्या पोस्टला अनेक लाईक्स मिळाले.