धमाल ऍक्शन, कड्डक संवाद असणाऱ्या “मुंबई सागा’चा ऑफिशल टिझर आउट
Updated On:

मुंबई – बॉलिवुडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता संजय गुप्ता यांनी जेव्हा गॅगस्टार “मुंबई सागा’ची घोषणा केली, तेव्हापासून प्रेक्षकांना या चित्रपटाची कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर निर्मात्यांनी काही महिन्यांपूर्वी लॉन्च केले होते.
दरम्यान, आता ‘मुंबई सागा’ चित्रपटाचा ऑफिशल टिझर प्रदर्शित करण्यात आला असून, टिझर मध्ये अभिनेता इमरान हाशमी आणि जॉन अब्राम मुख्य भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. धमाल ऍक्शन,कड्डक संवाद आणि जबरदस्त अभिनय याचा उत्तम टिझर मध्ये दिसून येत आहे.
या चिपटात जॉन अब्राहम, इमरान हाशमी, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बर, गुलशन ग्रोवर, रोहित रॉय, महेश मांजरेकर आणि अमोल गुप्ते प्रमुख भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट 1980-90 च्या दशकातील असून तेव्हा बॉम्बे ही मुंबईत बदलत होती.





