पूर्वसहमतीशिवाय गैरहजर राहिल्यास कारवाई
Updated On:

पुणे – महापालिका स्थायी समिती बैठकीला पूर्वसहमतीशिवाय गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.असे आदेश महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी काढले.
शहराचे बरेच महत्त्वाचे निर्णय घेणारी स्थायी समिती ही महत्त्वाची आहे. परंतु, या बैठकीला गांभीर्याने न घेता अनेक अधिकारी गैरहजर राहतात.
सध्या करोना पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना ऑनलाइन बैठकीत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना अनेक अधिकारी गैरहजर होते.
याबाबत समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी बैठकीतच नाराजी व्यक्त केली. पूर्व सहमतीशिवाय अधिकारी अनुपस्थित राहून नियमांचे उल्लंघन करत असल्याचे रासने यांनी आयुक्तांच्या निदर्शनाला आणून दिले.





